एक रावसाहेब मद्यपाननिषेधाची व्याख्यान द्यावयास निघाले. ते आपल्या शहरातील एका मजुराच्या घरात गेले. तो त्यास समोरच कोनाड्यात एक ताडीची बाटली भरलेली दिसली. राव साहेबांनी त्यास लागलाच उपदेश केला: पुष्कळ वेळ उपदेश झाल्यावर आजपासून मी दारूला शिवणार नाही, अशी शपथ घे आणि बेलभंडार उचल, म्हणून रावसाहेब त्याच्या पाठीस लागले. त्याने कशी बशी शपथ घेतली. तेव्हा रावसाहेब विशेष समाधान होऊन ते त्यास म्हणतात, 'असे आतापर्यंत तु आमचं सगळं ऐकलसं, पण आता आणखी एक ऐक म्हणजे मला फार समाधान होईल. तू ही बाटलीतली ताडी फेकून दे'
'रावसाहेब, मी ती फेकून दिली असती,पण त्यातील अर्धी माझ्या भावाची आहे.'
'बरं आहे. तुझी अर्धी तर फेकून दे.'
'पण वरची त्याची आहे, आणि खालची माझी आहे, ती कशी फेकता येईल.'