शंभरी उलटलेल्या एका माणसाकडे वार्ताहर गेला होता. शंभर वर्ष झाली तरी, त्याची प्रकृती धडधाकट आहे, हे पाहून तो वार्ताहर चकीत झाला. त्याने काहीशा कुतूहलाने विचारले, ''काय हो आजोबा, ह्या वयातही आपली प्रकृती इतकी धडधाकट आणि उत्तम आहे, त्यामागचं रहस्य तरी काय?
''शुद्ध हवा'' आजोबा म्हणाले.
''म्हणजे? '' वार्ताहराने गोंधळून विचारले.
''त्याचं असं झालं, '' आजोबा सांगू लागले, ''आमचं लग्न झालं तेव्हा अगदी पहिल्याच दिवशी ठरवलं की, आम्हा दोघांत भांडण झालं, तर ज्याची चूक असेल त्याने बाहेर फिरायला जयाचं. ''
''मग? '' वार्ताहराने विचारले, ''मग काय? '' आजोबा हसून म्हणाला, गेली पंचाहत्तर वर्षे मी मोकळ्या हवेतच फिरतोय ना, मग प्रकृती धडधाकट राहणार नाही काय? ''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा