Publish Date: Mon, 13 Jun 2016 (16:49 IST)
Updated Date: Mon, 13 Jun 2016 (16:52 IST)
पक्याचा 12 वी चा निकाल असतो,
तो त्याच्या मित्राला सांगतो,
"हे बघ तुक्या माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये. आणि जर एक विषय गेला असेल तर साईराम म्हण,
जर दोन विषय गेले असतील तर "ॐ साईराम म्हण".
आणि तीन विषय गेले असतील तर "ॐ श्री साईनाथाय नम :" असं काहीतरी म्हण,
तुक्या जातो आणि निकाल पाहून येतो,
मग पक्या त्याला हळूच खुणावतो "काय झालं रे?"
त्यावर तुक्या पक्याचे पाय धरून म्हणतो,
"..।।।अनंतकोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज परभ्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..