Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेट .... कधीतरी . . . आपलीच आपल्याशी

भेट .... कधीतरी . . . आपलीच आपल्याशी
, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (00:05 IST)
भेट
किती प्रगल्भ व्याप्ती आहे...
"भेट" या शब्दाची ...
खरचं खूपच् अर्थपूर्ण .....     
कोण..... कुणाला.... कुठे....
केव्हा ... कशाला .... "भेटेल" आणि का "भेटणार नाही"... ह्याला प्रारब्द्ध म्हणावं लागेल....

भेट कधी थेट असते
कधी ती गळाभेट असते
कधी meeting असते
कधी नुसतंच greeting असते

भेट कधी 'वस्तू' असते
प्रेमाखातर दिलेली
भेट कधी देणगी असते
कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली

भेट कधी 'धमकी' असते ...
"बाहेर भेट" म्हणून दटावलेली
भेट कधी 'उपरोधक' असते
"वर भेटू नका" म्हणून सुनावलेली

भेट थोरा-मोठ्यांची असते
इतिहासाच्या पानात मिरवते....
भेट दोन बाल-मित्रांची असते
फारा वर्षांनी भेटल्यावर
पिकल्या केसांचा अंदाज घेत
चाचपलेली.....

भेट कधी अवघडलेली
'झक' मारल्या सारखी ....
भेट कधी मनमोकळी
मनसोक्त मैफील रंगवलेली

भेट कधी गुलदस्त्यातली
कट-कारस्थान रचण्यासाठी
भेट कधी जाहीरपणे
खुलं आव्हान देण्यासाठी

भेट कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
भेट कधी अखेरची ठरते . .
मनाला चुटपुट लावुन जाते

भेट कधी अपुरी भासते
बरंच काही राहून गेल्यासारखी
भेट कधी कंटाळवाणी
घड्याळाकडे पाहुन
ढकलल्या सारखी . .

भेट कधी चुकुन घडते
पण आयुष्यभर पुरून उरते
भेट कधी 'संधी' असते
निसटुन पुढे निघुन जाते

भेट कोवळ्या प्रेमीकांची
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर
भेट घटस्फोटीतांची ही असते
हक्क सांगण्यासाठी मुलांवर

भेट एखादी आठवणीतली असते
मस्त nostalgic करते
भेट नकोशी भूतकाळातली
. . सर्रकन अंगावर काटा आणते

भेट .....
विधिलिखीत ... काळाशी-
न टाळता येण्याजोगी !

भेट ....
कधीतरी . . .
आपलीच आपल्याशी
अंतरातल्या.....स्वत:शी !
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नातवंड.......