Article Marathi Jokes Sms %e0%a4%b0%e2%80%8d%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4 %e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a6 113022100018_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'र‍जनीकांत'चे विनोद

रजनीकांतचे विनोद
WD
गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.

रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.


रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.

पुढे जा...


webdunia
WD
रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.

चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!


2015 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.

पुढील पानावर....।


webdunia
WD
नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये

मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!


‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!

Share this Story:

Follow Webdunia marathi