suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संसाराचा गोडवा

नवरा बायकोच्या जोरदार भांडणानंतर खूप चिडलेला नवरा रागाने घराबाहेर जायला निघतो...
बायको ओरडते -: कुठे चाललात मैदान सोडून?
नवरा -: जीव द्यायला..
बायको -: जीव द्यायचा प्लॅन कॅन्सल झाला तर, येतानां कांदे आणी तुरीची डाळ घेऊन या... डाळकांदा कर असं दोन दिवस झाले कोकलताय..
वरील भांडणातील विनोदाचा भाग सोडला तर भारतीय नवराबायकोच्या अटूट नात्याच आणी खंबीर विवाह संस्थेचे दर्शन होते. 
कारण बायकोला शंभर टक्के खात्री असते कि आपला प्रेमळ नवरा आपणाला आणि आपल्या लेकरांना सोडून कुठेही जाणार नांही..पण त्याचवेळी " आपल्या पती ने खरेच जीव दिला तर ? अशी शंका ही तिला घाबरून सोडते आणी त्यासाठी, त्याच्या चिडलेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी - तुमच्या आवडीचा डाळकांदा करणार आहे, लवकर परत या असे लटक्या रागात सुचवते..
ही ताकत आहे आपल्या भारतीय संस्काराची, संस्कृतीची आणी मजबूत विवाह संस्थेची...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा आमिरच्या मुलाने ऐश्वर्याच्या मुलीला केले Hug




Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi