Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व चहाच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक अर्पण!!!

सर्व चहाच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक अर्पण!!!
चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो, 
पृथ्वीवरच्या सर्व पेयांचा तो बादशहा असतो ! 
 
तुमच्या माझ्यासाठी, आपणा  सर्वांसाठी आनंदाचा झरा असतो!
चहा केव्हाही प्यावा ------
सकाळी सुस्त शरीरात जोम येण्यासाठी प्यावा ,
संध्याकाळी श्रमपरिहारार्थ प्यावा!
 
थंडीची हुड़हुड़ी घालवण्यासाठी प्यावा,   
घामाच्या धारा वाहत असतानाही प्यावा,
पावसाळी कुंद हवेत प्यावा ,
मित्रां बरोबर धमाल करतांना प्यावा.
 
चहा खुशीत असतांना प्यावा,अन निराश अवस्थेत तर प्यावाच प्यावा !
चहा जागून अभ्यास करतांना प्यावा, ऑफिस मधे मीटिंग 
चालू असतांना प्यावा, 
आवडतं पुस्तक वाचता वाचता प्यावा ,आणि कविता 
करतांनाही प्यावा !
 
चहा कसाही प्यावा -------
घरातल्या छोट्या कपातून किंवा मोठ्या मगातून,
किंवा टपरीवरच्या प्लास्टिक ग्लासातूनही प्यावा 
बशीत ओतून फ़ुर्र करत प्यावा ,किंवा दिवसभर घोटघोट 
प्यावा !
 
कमी साखरेचा,वा बिनसाखरेचा  प्यावा,
उकळून दाट केलेला बासुंदी सारखा प्यावा
किंवा पत्ती चहा लिंबू पिळून प्यावा, 
वेलदोडा, सुंठ घालून प्यावा किंवा नुसताच प्यावा !
 
चहा कुणीही,,केंव्हाही, कसाही, कुठेही, कितीही प्यावा ------
 
कारण चहा हे केवळ एक पेय नसतं ,ते पृथ्वीवरचं अमृत असतं !!
तुम्हा -आम्हाला सर्वांनाच आवडणारं असतं ....
Dedicated all chahabaaj

Share this Story:

Follow Webdunia marathi