बिस्कीटांचा कारखाना पाहण्यासाठी महिला मंडळाची सहल गेली होती. त्यांना कारखाना दाखवितांना तिथला मार्गदर्शक एकदा घसरून पडला तो थेट कणकेच्या भल्या मोठ्या गोळ्यात. त्याने चपळाईने कपडे साफ केले आणि पुढचा भाग दाखविला. जातांना तो म्हणाला, 'काही पुन्हा पाहायचे असेल तर सांगा म्हणजे दाखवेन'.
'बाकी काही नाही, पण मघाशी कणकेत पडलात तसे पुन्हा पडून दाखवा,' विमलबाई शांतपणे म्हणाल्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा