Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिसेंबर : जाणून घ्या तुमचे मासिक भविष्यफल

डिसेंबर : जाणून घ्या तुमचे मासिक भविष्यफल

वेबदुनिया

WD
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फ़ेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल.

वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे.

मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विदेशातही जाऊ शकता. काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या.

कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना गती येईल. आरोग्याप्रती बेपर्वाई तुम्हाला महागात पडू शकते. धर्माप्रती आवड वाढेल. मित्रांची मदत मिळेल. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा.

सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल.

कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
वैवाहिक जीवन तुमचे सहकार्य आणि वेळ मागत आहे. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल. वेळेचे महत्त्व ओळखा. तुम्ही जरा व्यावहारिक झाले पाहिजे, अति भावनिकता तुमचे नुकसान करू शकेल. वडिलांचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत पाडेल.

तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)
संघर्षानेच यशप्राप्ती होईल. अचानक कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. तुमच्या या घाईगडबडीचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतील. शांत राहून चांगले कर्म करत राहा. मांसाहार आणि मद्यसेवन टाळणे ठीक होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवडयात परिस्थिती बदलायचा सुरूवात होईल. वर्षाचा शेवट सकारात्मकतेने होईल.

वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
काम वेळेत पूर्ण होतील. योजना पूर्ण होतील. १५ तारखेनंतर कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करा. ब्येत उत्तम राहील. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे.

धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ होतील. एखाद्याला दिलेले वचन जरूर पाळा. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल.

मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
या महिन्यात ग्रह तुमच्यासोबत आहेत. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी वेळ आहे. लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल.

कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. १५ तारखेनंतर कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे.

मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात. स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळू शकते. या दरम्यान तुम्ही उंच झेप घेऊ शकता, पण कठोर परिश्रमांना तयार असाल तरच तुमच्या सकारात्मक उर्जेचा स्त्रोत निरंतर टिकेल. मित्रांची मदत मिळेल. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi