पितरांना पिंडदानाने करा तृप्त!
पूर्वज तसेच कुलस्वामिनी यांचे आपल्याकडे होणार्या प्रत्येक शुभ कार्यात पुजन केले जात असते. सगळ्यात आधी वरील मंडळींना निमंत्रण दिले जात असते. हिंदू धर्मानुसार शुभ कार्याआधी पितृ श्राद्ध, पितृ तर्पण केले पाहिजे. आपल्या कुटुंबात लग्न अथवा शुभ कार्य निश्चित झाले असेल तर त्याच्या पंधरा दिवस आधी आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान करून त्यांना तृप्त केले पाहिजे. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने शुभ कार्यात कोण्त्याच प्रकारच्या अडचणी येत नाही.पितृ पक्ष सोळा दिवसांचा असतो. हिंदू धर्मानुसार भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्यापर्यंतच्या पंधरवड्यास 'पितृपक्ष' मानला जातो. या पंधरवड्यात पिंडदान खूप महत्त्वपूर्ण तसेच लाभदायक असते. पितृपक्षात प्रत्येक पितर आपल्या कुटुंबात वास करत असतात.प्रत्येक कुटुंबात पितरासाठी तर्पण केले पाहिजे. त्यामुळे आपले अतृप्त राहिलेले पितर तृप्त होऊन मोक्ष प्राप्त होत असतात. तसेच आपल्याला शुभ आशीर्वादही देत असतात. आपल्या कुटुंबातील काय तर आपल्या शेजारी असलेले पितरही तृप्त होऊन मोक्ष प्राप्त करत असतात. नरकेषु समस्तेषु यातनासु च ये स्थिता:।तेषामाप्यायनायैतध्दीयते सलिनं मया।।येऽबाँधवा बान्धावश्च येऽयजन्मानि बान्धवा:।ते तृप्तिमखिला यान्तु यश्चास्मतोडभिवाच्छति।।
पितृपक्षात तीर्थक्षेत्री जाऊन पिंडदान अथवा त्रिपिंडी तर्पण केल्याने आपले कुटुंब पितृदोषातून मुक्त होत असते. यजुर्वेदात पितरांच्या तर्पणासाठी विशेष पूजा विधी सांगितला आहे.पितृभ्य: स्वधायिभ्य स्वधा नम:। पितामहेभ्य: स्वाधायिभ्य: स्वधानम:। अक्षन्पितरोऽभीमदन्त पितरोडतीतृपन्त पितर: पितर: शुन्धध्वम।ये चेह पितरो ये च नेह याश्च विधयाँउच न प्रत्रिध।त्वं वेत्थयति ते जातवेद: स्वधाभिर्यज्ञ सुकृतं जुषस्व। पितर हे आपला वंश वाढवत असतात. आपल्या घरात समुध्दी आणत असतात. पितरांच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती, तसेच कुटुंबातील प्रत्येकाला आशीर्वाद देत असतात. ऊँ गोत्रन्नो वर्ध्दतां दातारो नोत्रभिवर्द्धन्तां वेदा: संततिरेव च।। श्रद्धा च नो मा व्यगमद् बहु देयं नोऽस्तु।। अन्नं च तो बहु भवेदतिधीश्च लभेमहि।। याचिता न: संतु मा च याचिष्म कञ्चन।।पितृपक्षात दानधर्म केले पाहिजे. आपल्या घरातून कोणीच विन्मुख परत जायला नको. ब्राम्हण भोजन, मुक्या प्राण्यांना धान्य भरविले पाहिजे. आपले पितर पितृपक्षात कोणत्याही रूपात आपल्या घरी पोहचत असतात.सुख, यश, वैभव प्राप्त करण्यासाठी त्यांना तृप्त केले जाते.