Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक राशी भविष्य

साप्ताहिक राशी भविष्य

वेबदुनिया

WD
मेष : दीर्घ यात्रा फायदेशीर तर असतील पण यासाठी अधिक पैसेही खर्चावे लागतील. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही. भौतिक गरजेच्या वस्तू खरेदी कराल. फिरण्यावर आणि मनोरंजनावर अधिक खर्च कराल. शत्रुंपासून सावध राहा.

वृषभ : एका मांगलिक कार्याचा योग जुळत आहे. सकारात्मक वातावरण कायम राहील. फार मेहनत करावी लागेल. हो, त्यानुसार फळही मिळेल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. उगीचच वादात पडू नका. तब्येत ठीक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन : मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल.

कर्क : लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारात नफ्यात घट होईल.

सिंह : नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. अपत्याची चिंता सतावेल.कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध राहा.

कन्या : कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. जोडीदाराच्या प्रती उदार धोरण ठेऊन वागा. तुमचा राग बनत्या गोष्टी बिघडवू शकतो. मद्यसेवनापासून दूर राहा, हे तुमच्यासाठी हितकारक आहे. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल.

तूळ : जुनी थांबलेली कामे मार्गी लागतील. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळेल. तुमच्या वाणीला नियंत्रणात ठेवा. तुमच्या कुठल्यातरी गोष्टीवर तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. कुठल्यातरी दुर्घटनेची शक्यता तयार होत आहे, यामुळे अतिरिक्त सावधानी बाळगा.

वृश्चिक : जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे.

धनु : तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता. आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही तुमच्या या वागण्याने नाराज होऊ शकतात, वाहन वगैरे चालवताना सावधानी बाळगा. कोणा वृद्धाचा अपमान करु नका.

मकर : तुम्ही जीवनात नवे काहीतरी कराल. रचनात्मकतेत वाढ होईल आणि तुमच्या कामाचे कौतूक होईल. दूर राहणाऱ्या नातेवाइकांकडून शुभ बातमी मिळण्याचे संकेत आहेत. काळ बदलत आहे, पण लक्षात असू द्या की प्रगतीच्या झाडावर फळं मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी सावलीसारखे काम करतील. नवे वाहन तुमच्या आनंदात भर टाकेल.

कुंभ : मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे.

मीन : व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकतो. चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi