Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सैफ अली खान : मोठ्या संधीचे शुभ संकेत

सैफ अली खान : मोठ्या संधीचे शुभ संकेत

वेबदुनिया

WD
सैफचा जन्म 16 ऑगस्ट रोजी शुक्ल योग, श्रावण नक्षत्रात झाल्याने तो जगविख्यात झाला. जन्माच्या वेळेस सूर्याचे कर्क राशीत परिभ्रमण सैफच्या स्वभावाला उग्र बनवतो. हा योग संघर्ष करवेल पण यशही मिळवून देईल. सैफच्या जन्मपत्रिकेनुसार चंद्रमा चाहत्यांच्या संख्येत वाढ करून देतो.

मंगळ जन्माच्या वेळेस ज्या राशीत परिभ्रमण करत होता, त्याच्या परिणामस्वरूप आज सैफ आर्थिक रूपेण संपन्न आहे. गुरु त्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून वागण्याची प्रेरणा देतो. शुक्र देखील आर्थिक दृष्टीने संपन्न बनवत आहे.

शुक्र-शनीमुळे सैफ कुशाग्र बुद्धीचा आहे. राहू आणि केतू मानसिक व शारीरिक त्रास देऊ शकतात. त्यासाठी त्याला राहू-केतूची शांती करायला पाहिजे.

webdunia
WD
सैफचा जन्म चंद्राच्या महादशेत झाला आहे. ज्याचा भोग्यकाळ 7 वर्ष 4 महिने 5 दिवसाचा होता. वर्तमानात गुरुची महादशा सुरू आहे. याची अवधी 21.12.2002 ते 21.12.2018 पर्यंत राहणार आहे. नंतर 3.7.2013 पर्यंत गुरुच्या महादेशत शुक्राची अंतर्दशा राहील.

पुढील महिन्यात भविष्याप्रमाणे सप्टेंबर 2012 उत्तम राहणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर 2012 मध्यम असेल. डिसेंबर महिना सैफच्या आरोग्यासाठी कष्टकारक असू शकतो, म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

जानेवारी 2013मध्ये त्याला चांगला व मोठा मोका मिळेल. फेब्रुवारी-मार्च 2013 सामान्य राहील. एप्रिल 2013मध्ये गुरु कमजोर राहील, मे-जून 2013फारच उत्तम असेल. जुलै मिश्रित फळ देणारा असेल पण त्यासाठी सैफला नीलम (खडा) धारण केले पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi