अंकानुसार जानेवारी महिन्याचे राशिभविष्य!
अंक 1 - जानेवारी 2012चे राशीभविष्य जानेवारी - नवीन वर्षातील या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत तुम्हाला सामाजिक, राजकीय क्षेत्रात मान- सन्मान प्राप्त होईल. परंतु, महिन्याच्या दुस-या आठवड्यात तुमचे शत्रू तुमच्या मार्गात अडथळे आणतील. व्यापार व्यवसायात तणावात्मक स्थिती निर्माण होईल. न्यायालयीन खटल्यात तुमच्या विरोधात निर्णय लागतील. महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्या दृष्टीने अनुकूल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. राजकीय क्षेत्रातील मंडळींसाठी हा आठवडा चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतो. शिक्षणामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या क्रमांकाचा स्वामी सूर्य असल्याने त्याच्या प्रभावामुळे हा महिना तुम्हाला चांगले फळ देणारा ठरेल.अंक 2 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - जानेवारी महिन्यात सर्व क्षेत्रात जागरूक राहाणे आवश्यक आहे. अंक दोन असणा-या लोकांनी शत्रूला हरवण्यासाठी कृष्ण नीतीचा वापर करावा. महिन्याच्या मध्यात महत्वाच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात विरोधी अडचणी निर्माण करू शकतात. महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभाचा योग आहे. जोडीदाराचे मत विचारात घेऊनच काम करा तरच व्यवसायात फायदा होईल. अंक 3 - जानेवारी 2012चे राशीभविष्य जानेवारी - या महिन्यात ग्रह स्थिती चांगली आहे. प्रवासात सावधानता बाळगावी, नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. दृढ निश्चयाने आणि बुद्धीने कामे केल्यास चांगले यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात तणावाची स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता. महिन्याच्या शेवटचा कालावधी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी अनुकूल असेल. तरुण तरुणींसाठी शेवटचा आठवडा शुभ फळ देणारा. अंक 4 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - हा महिना नोकरीसाठी चांगला नाही. प्रतिस्पर्धीच्या तुलनेत स्वत:ला कमजोर समजाल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. व्यवसायात नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा. वेळ अनुकूल आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. मन आनंदी राहील. जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याचा योग बनेल. महिन्याच्या शेवटी नव्या कामामुळे आनंद मिळेल. गुंतवणूकीसाठी कालावधी एकदम चांगला आहे. सहका-यांना आपली प्रगती सहन होणार नाही. अंक 5 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - या महिन्यात तुमचे वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य कमी लाभेल. परदेशातून लाभप्राप्तीचे योग आहेत. महिन्याच्या मध्यकाळात आत्मविश्वासामुळे अधिक नफा मिळणार आहे. तरीही निर्णय घेताना वेळेवर घ्या. काही क्षेत्रातून सहकार्य मिळाल्याने फायदा होईल व त्याचा विस्तार होईल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्याची समस्या निर्माण होईल. निराशा येईल पण ताजेतवाने राहण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात तुम्ही नविन वाहन घेण्याचा विचार करु शकाल.
अंक 6 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - हा महिना या अंकाच्या लोकांसाठी मोठी फळे घेऊन येत आहे. कार्यालयात सगळ्याचे सहकार्य मिळणार आहे. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे आपल्या कार्यात यश मिळेल. शुक्राचा प्रभाव असल्याने राग अनावर होईल. या महिन्यात शुक्राची आराधन करा. शिवलिंगवर पाणी आणि कच्चे दुध चढवावे. या महिन्यात काही रचनात्मक काम करा ज्यामुळे समाजात यश किंवा प्रसिध्दी मिळेल. या महिन्यात पांढरया रंगाची कपडे परिधान केल्यास अधिक लाभ होईल.अंक 7 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 अथवा 25 तारखेला झाला असेल तर तुमचा शुभ अंक 7 आहे. या अंकाचा स्वामी वरुणदेव आहे. 7 अंक असणार्या लोकांवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो. या महिन्यात घर खरेदी करण्याचे अथवा बांधण्याचे योग आहेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीच्या कामांना विलंब होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाग्य साथ देईल. अंक 8 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - शनी ग्रह हा अंक आठचा स्वामी आहे. ज्या लोकांचा अंक आठ आहे, ते लोक अचानक काम करण्यात विश्वास ठेवतात. त्यांची विचारशक्ती अद्भुत असते. त्यांच्याकडून बळजबरीने कोणतेही काम करून घेता येत नाही. आठ अंक असणा-या व्यक्तींसाठी जानेवारी महिना मध्यम स्वरूपाचा आहे. या महिन्यात व्यवसायात उन्नती होईल. जमीन व्यवहारात लाभ होईल. शत्रूंना पराजित कराल. बढती मिळण्याचे योग आहेत. अंक 9 - जानेवारी 2012चे राशीभविष्यजानेवारी - जानेवारी महिना ९ अंक असणा-या व्यक्तिंसाठी चांगला राहणार आहे. गुतंवणूकीतून लाभ होईल. व्यापारासाठी प्रवासाला जाणार असाल तर ही यात्रा फायदेशीर ठरेल. नवे संबंधाचे प्रस्ताव येतील. जोडीदाराच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला वेळ मिळणार नाही. अचानक प्रवासाचा योग घडू शकतो, आणि हा प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यवसाय चांगला राहिल. नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंददायी राहिल.