काय तुमच्या पत्रिकेत 'अंगारक योग' आहे!
जर मंगळ आणि राहू हे दोघे एकत्र कुंडलीत विराजमान झाले असतील तर त्याला 'अंगारक योग' असे म्हटले जाते. 'लाल किताबा'त या योगाची तुलना पिसाळलेल्या हत्तीसमान केली आहे. ज्याच्या कुंडलीत 'अंगारक योग' येतो त्याच्या जीवनात बरेच चढ-उतार येतात. या योगाच्या प्रभावामुळे प्रॉपर्टी विषयक बर्याच अडचणी येतात. कुंडलीतील चौथ्या स्थानात हा योग आल्याने संबंधीत व्यक्तीच्या आईच्या सुखात कमतरता येते. तर महिलांना संतती विषयक समस्या निर्माण होतात.ज्योतिषशास्त्रात 'अंगारक योगा'ला अशुभ मानले जाते. कुंडली अचानक येऊन बसलेल्या या योगाची शांती करण्यासाठी हे उपाय करा - -
दररोज सकाळी थोडं शहद खावे. -
मातीच्या भांड्यात कुंकू ठेवून ते भांडे घरात ठेवावे.-
मंगळवारी हनुमानाची शेंदूर लावून पूजा करावी.-
एका बाजुने शेकलेली गोड पोळी कुत्र्याला खाऊ घाला.-
रात्री झोपताना उशीजवळ पाण्याने भरलेली घागर ठेवावी. सकाळी उठल्यानंतर ते पाणी झाडांना टाकावे. -
चांदीचं नाणे सदैव आपल्याजवळ ठेवावे. -
सोने, चांदी आणि तांबे या तीन धातुंची अंगठी उजव्या हाताच्या बोटात घालावी.-
घरात हस्तदंत ठेवावे.