सोमवार, 20मे पासून जिल्हास्तरीय क्रिकेट पंच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणत आले आहे. सोलापुरातील क्रिकेटचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संघटनेला अधिकाधिक पंचांची गरज भविष्यात भासू शकते. या दृष्टिकोनातून सोलापुरातील इच्छुकांना क्रिकेट खेळाविषयी आवड असलेल्यांना ही संधी संघटनेने उपलब्ध करून दिलेली आहे.
तसेच नजीकच काळात होणार्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या होणार्या पंच परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर क्रिकेटचे नियम शिकवल्याने सोलापुरातून चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त पंच तयार व्हावेत, हा संघटनेचा उद्देश आहे.
प्रशिक्षण वर्ग नक्कीच मोलाचा ठरेल आणि या वर्गाला उपस्थित क्रिकेटप्रेमींना सोलापूर जिल्ह्यात पंच म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष उदय डोके यांनी व्यक्त केला. या शिबिरासाठी बीसीसीआय लेवल 1 उत्तीर्ण पंच अनीश सहस्रबुध्दे मार्गदर्शन करणार असून त्याचा फायदा इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन सुनील ढोले, भारत वाले, संज मोरे, श्रीनिवास शिवाळ, प्रशांत बाबर यांनी केले आहे.
प्रशिक्षण वर्ग 20 ते 26 मे दरम्यान जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात भरवला जाणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 10 ते 4 असून नोंदणीसाठी 8237122253 या क्रमांकावर संपर्क साधावा
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा