Article Marathi Jyotish 2013 %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b8 %e0%a4%b6%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%a4 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80 113040600004_1.htm

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बॉस'शी पटत नाही?

बॉस

वेबदुनिया

WD
बॉसशी पटत नसल्याने तुम्ही वारंवार नोकरी बदलता? किंवा ‍तुम्हाला तुमचा बॉस तुम्हाला आवडत नाही? ...मग थांबा नोकरी बदलण्यापूर्वी आपल्या जन्मकुंडलीचा अभ्यास करा.

तुमच्या जन्मकुंडलीत जर बॉसचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रह शुभ नसल्यास तुम्ही कितीही नोकर्‍या बदललात तरी तुम्ही समाधानी राहणार नाही. यामुळे नोकरी बदलण्याऐवजी त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

कुंडलीतील दहावे घर आपल्या पदप्रतिष्ठाचे असते. हेच घर आपल्या बॉसचा स्वभावही दाखवेल. जर येथे कोणत्याही शुभ्र ग्रहाची रास असेल तर तुम्हाला बॉस चांगला मिळेल (विशेषता: धनू, मीन, कर्क). पण क्रूर राशी (उदा. मेष, मकर, वृश्चिक) असतील तर बॉस आक्रमक, रागीट आणि दबदबा निर्माण करणारा मिळेल. शुक्राच्या राशी (उदा. वृषभ, तुळ) असेल तर तुमचा बॉस खुबमस्करी करणारा व कलावंत मनाचा असेल. बुधाच्या राशी (मिथून, कन्या) असेल तर हुशार परंतु घबराट असेल.

webdunia
WD
दहाव्या स्थानावर क्रूर ग्रह असेल तर बॉसशी नेहमी खटके उडत राहातील. शुभ ग्रह असेल तर तुमचे आणि त्यांचे सूर चांगले जुळतील. दहाव्या स्थानावर जी राशी आहे त्याचा स्वामी ग्रह शुभ स्थानावर असेल तर बॉस चांगला राहील. परंतु अशुभ प्रभावात असेल तर बॉसशी नेहमी खटके उडत राहील. परंतु, या ग्रहाची लग्नाशी मैत्री असेल तर बॉस चांगला मिळेल.

कुंडलीत गुरू, सूर्य शुभ असेल तर मोठ्यांचे मार्गदर्शन मिळत राहील. शनी-मंगळ शुभ असेल तर सहकार्‍यांचे सहकार्य मिळत राहील.

बॉसला घाबरून नोकरी बदलण्यापूर्वी जन्मकुंडली पाहून ग्रहांना प्रसन्न करावे. ग्रह खुश असतील तर बॉसचा स्वभावातही बदल शक्य होईल.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi