Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तूळ राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

तूळ राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

वेबदुनिया

WD
गुरूचे भाग्यस्थानातील आणि दशमस्थानातील सौख्यकारक भ्रमण हीच तुमच्या नवीन वर्षात जमेची बाजू आहे. मंगळाचे व्ययस्थानातील आणि राशीतील भ्रमणल तर राशीतील शनीचे वास्तव्य तुम्हाला एका संस्मरणीय पर्वातून वाटचाल करायला लावणार आहे. आहे तो क्षण आंनदाने जोपासण्याची दृष्टी ठेवा. अभ्यासू व जिज्ञासू दृष्टिकोन ठेवून वागण्याच्या तुमच्या सवयीला पोषक असेच ग्रहमान यंदा लाभलेले आहे. छंद आणि व्यासंग चांगल्या तर्‍हेने जोपसले जातील.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...


धंदा, व्यवसाय व नोकरी

webdunia

WD


जानेवारी, फेब्रुवारीत पैशाची उभारणी कराल. व्यापार-उद्योगात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्या कामातून फायदा होत नाही असे काम बंद करून त्या जागी दुसरे काम सुरू करावेसे वाटेल. कारखानदारांना नवीन तंत्रमान स्वीकारावे लागेल. जुने करार संपून नवीन करार होतील. परदेशातील कामला चालना मिळेल. संपूर्ण वर्षभर पैसे मिळूनही पैशाविषयी चिंता राहील. प्रकाशक व लिखाण क्षेत्रातील लोकांना चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यापार्‍यांना पुढील दीपावलीपर्यंत बरेच काही साध्य करता येईल.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...


गृहसौख्य व आरोग्यमा

webdunia

WD


येत्या वर्षात मंगळ बराच काळ तुमच्याच राशीत आणि व्ययस्थानात राहणार आहे. त्या व्यतिरिक्त ग्रहणे तुमच्या राशीत आणि सप्तमस्थानात पडतील याचा परिणाम कौटुंबिक सौख्यावर फारसा चांगला होणार नाही, परंतु गुरु तुम्हाला साथ देणार असल्यामुळे तुम्ही वेळ मारून नेऊ शकाल. घरामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी सारासर विचार करून निर्णय घेणे आवण्यक आहे. प्रकृती आणि पैसा या दोन्हीबाबतीत यंदा तशा अडचणी जाणवल्या नाहीत तरी जूनपर्यंत घेऊनच पुढे जा. मुलांच्या प्रगतीकरिता आवश्यक कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये पैशांची तजवीज करावी लागेल. तुमचे हितचिंतक आणि मोठ्या व्यक्ती मदत करतील. तूळ रास ही चर गुणधर्माची, वायू तत्त्वाची आहे. तिचा अधिपती शुक्र आहे व चिन्ह तराजू आहे. शुभरंग निळा, शुभरत्न हिरा व आराध्य दैवत व्यंकटेश-देवी-बालाजी आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi