Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोव्हेंबर 2014 ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाईल

नोव्हेंबर 2014 ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाईल
, बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (15:53 IST)
मेष : हा महिना आपल्या व्यवसायासाठी चांगला आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय पार्टपशिपच्यामाध्यमातून करू शकता. तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मात्र, यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. योग्य पावले उचललीत तर ते सहज शक्य होईल. आपण आपल्या अंत:मनाचे ऐका. त्यामुळे तुम्ही एक चांगली भूमिका बजावू शकाल. या महिन्यात तुम्ही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात चांगले योगदान देऊन तुम्ही एक यशस्वी व्यक्ती व्हाल.

वृषभ राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
वृषभ : नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. त्यात यश मिळेल. तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. यामुळे ती आपल्यासाठी फायदेशीर बाब असेल. आपल्या जीवनात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे व्यवसायात भरभरात शक्य आहे. या महिन्यात तुमचा जास्त प्रवास संभवतो. जे खेळाशी कनेक्ट आहेत. त्यांना या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल.

मिथुन राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
मिथुन : गुरूच्या स्थितीमुळे तुमचे नुकसान होण्यापेक्षा जास्त लाभ होईल. हा महिना आपल्या जीनवात प्रगती करू शकते. त्यामुळे जीवनमान स्तर उंचावू शकतो. आपण सुखासारख्या गोष्टी जीवनात साध्य करू शकाल. आपणाला हा महिना अधिक दमदार वाटेल. शनी आपल्या जीवनाचा उत्तम कामगिरी बजावू शकेल.

कर्क राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
 
webdunia
कर्क : अनावश्यक भीती आणि चिंता यापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहायला हवे. चौथ्या घरात शनिची स्थिती २ नोव्हेंबरनंतर चांगली असेल. या महिन्यात तुम्हाला लग्नाचा योग आहे. त्याप्रमाणे तुमच्या मनात बदल होण्याची शक्यता आहे. कारण गुरू पहिल्या स्थानात पोहोचेल. त्यामुळे आपल्या जीवनात बदल घडून येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०१४ आपल्याला कामात खूप व्यस्त ठेवील. हा म‍हिना आपल्यासाठी खास नाही. मात्र, तुम्ही केलेल्या पहिल्या कार्याच्या जोरावर चांगले रिझल्ट मिळेल.

सिंह राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
सिंह : हा महिना आपल्याला एका चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. हा महिना सामाजिक आणि आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी चांगले आहे. नोव्हेंबर २०१४मध्ये तुमच्यासाठी काही गोष्टी चांगल्या घडतील. आपण आपल्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी कायम जोडण्यासाठी काहीही करू शकता. तुम्हाला चांगली ऊर्जा प्राप्त होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील.

 कन्या राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
कन्या : शांतता लाभेल. तुम्ही रोमॅंटीग जीवनाची योजना तयार कराल. कारण तुमचे ग्रह तुमच्या बाजुने आहेत. आपले कौटुंबिक जीवन आनंदी आणि खुशीचे असेल. नोव्हेंबर २०१४मधील आपल्याला व्यक्तीगत विशेष लक्ष द्यावे लागेल. याच दरम्यान थोडासा तनाव येऊ शकतो. हा महिना काहीबाबत चांगले आहे. जे काम आपण व्हायला पाहिजे असे म्हणत असाल ते होईल.
तूळ राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
तूळ : तूळ राशीमध्ये शनि ग्रह दोन नोव्हेंबरनंतर प्रवेश करील. तसेच नोकरीमध्ये परिवर्तनच्या पार्श्वभूमीवर पदोन्नती आणि काहीबाबतीत चांगले आहे. आपल्या राशीत राहूची युती असल्याने थोडेसे तणावाचे वातावरण असेल. मात्र, आपले लक्ष आणि आपली आनंदी राहण्याची वृत्ती फिलगुड आणील.
 
वृश्चिक राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
वृश्चिक : आपल्या राशीमध्ये शनिचा प्रवेश आहे. त्यामुळे परिवर्तन होऊ शकेल. त्याचा लाभ तुम्हाला होईल. मात्र, जीवनात प्रेमाच्याबाबतीत अडथळा येण्याचा धोका आहे. जे आधीपासून प्रेमात असतील त्यांचा आनंद द्विगुणीत होईल. ते प्रेमाचा आनंद चांगला लुटतील. विवाहीतांना मुलं होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. अविवाहितांचा या महिन्यात लग्न जमण्याचा योग्य आहे. एकंदरीत हा महिना ताजी हवा घेण्यासाठी झोका असेल.
धनू राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
धनू : हा महिना आपल्यासाठी एक आदर्श असेल. आपण केलेले संकल्प आणि काही गोष्टी पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी नवीन आशा घेऊन आलेय. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात केलेला संकल्प पूर्ण कराल. आपल्या क्षमतेने तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल. अविवाहितांचे विवाह  जमण्याचा योग आहे.

मकर राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
मकर : आपण सरकारी अधिकारी यांच्यावर चांगला प्रभाव टाकू शकाल. या महिन्यात तुम्ही घरांच्या समस्येतून बाहेर पडाल. घराच्याबाबतीत तुमचे समाधान होईल. तुम्हाला नातेवाईक आणि शेजारी यांच्या उत्पनातील काही समस्यांमुळे तुम्हाला चिंता असेल. विशेत: नोवहेंबरमध्ये आपल्या ध्येयाबाबतीत तुम्ही अग्रेसर असाल. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. या महिन्यात तुम्हाला चांगली ऊर्जा प्राप्त होईल. त्यामुळे तु्म्हाला वेगळे ओळख मिळेल. आपल्याला पत्नी किंवा पत्नी चांगली सहाय्य ठरेल. 
 
कुंभ राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
कुंभ : तुम्ही यामहिन्यात संपत्ती किंवा इतर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. या महिन्यात एखादी नवीन संधी येईल आणि अधिक प्रसिद्धी मिळेल. तसेच यश मिळणार आहे. तुम्ही जमीन खरेदी करू शकाल. नोव्हेंबर महिन्यापासून राजकारणात प्रवेश कराल. अनेक संधी आहेत. त्यामुळे अनपेक्षित नफा मिळेल. नोव्हेंबर २०१४मध्ये व्यावसायिक जीवनात मोठी संधी आहे. त्यामुळे आपल्या खात्यात खूप काही येईल. 
 
मीन राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....
webdunia
मीन : ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आपणहून येईल. लग्न होऊन तुम्ही परदेशवारीही करू शकाल. आपण सामाजिक कार्य़क्रमात सहभागी होऊ शकता. आपण आपल्या जीवनात नवीन संबंध करण्यावर भर द्याल. मीन राशीतील काहींसाठी नोव्हेंबर २०१४मध्ये आपले लक्ष्य गाठण्यासाठी जोर लावला तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्यामुळे तुमच्या जीवनात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. आपण केलेले संकल्प तडीस नेण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवावा लागेल. कच खाऊ नका. त्यामुळे तुम्हाला जोमाने पुढे जाता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi