मीन राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल
राश्याधिपती गुरुचे चतुर्थस्थानातील आणि पंचमस्थानातील भ्रमण, मंगळाचे सप्तमस्थानातील आणि अष्टमस्थानातील भ्रमण, तर शनीचे तेथेच असलेले वास्तव्य या ग्रहस्थितीमुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला शांततेकरिता धडपड करावी लागेल. स्पवप्नात तसेच मनमानीप्रमाणे अनेक बेत करण्यात तुम्ही सतत मग्न असता. माशाप्रमाणे सतत चंचल असा स्वभाव आहे. एका विचारात जास्त काळ राहणे अशक्य वाटते. मन स्थिर ठेवून काम केलेत तर यातूनही तुम्ही सहीसलामतपणे बाहेर पडू शकाल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी..
व्यापारी वर्गाला एकंदरीत वर्ष खडतर आहे. योग्य परिस्थितीची साथ मिळविण्याकरिता बरीच धडपड करावी लागेल. फेब्रुवारी आणि पुन्हा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी आर्थिकदृष्टया लाभदायक ठरेल. पूर्वी घेतलेली कर्जे, कामगारांचे प्रश्न आणि बाजारातील घडामोडी यावर मात करण्यासाठी वर्षभर सतर्क राहावे लागेल. स्वत:ची मर्यादा ओलांडू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. प्रवास घडेल. परदेशवारीही करण्याची शक्यता आहे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....