Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मीन राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

मीन राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

वेबदुनिया

WD


राश्या‍धिपती गुरुचे चतुर्थस्थानातील आणि पंचमस्थानातील भ्रमण, मंगळाचे सप्तमस्थानातील आणि अष्टमस्थानातील भ्रमण, तर शनीचे तेथेच असलेले वास्तव्य या ग्रहस्थितीमुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला शांततेकरिता धडपड करावी लागेल. स्पवप्नात तसेच मनमानीप्रमाणे अनेक बेत करण्यात तुम्ही सतत मग्न असता. माशाप्रमाणे सतत चंचल असा स्वभाव आहे. एका विचारात जास्त काळ राहणे अशक्य वाटते. मन स्थिर ठेवून काम केलेत तर यातूनही तुम्ही सहीसलामतपणे बाहेर पडू शकाल.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी..


धंदा, व्यवसाय व नोकरी

webdunia

WD


व्यापारी वर्गाला एकंदरीत वर्ष खडतर आहे. योग्य परिस्थितीची साथ मिळविण्याकरिता बरीच धडपड करावी लागेल. फेब्रुवारी आणि पुन्हा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी आर्थिकदृष्टया लाभदायक ठरेल. पूर्वी घेतलेली कर्जे, कामगारांचे प्रश्न आणि बाजारातील घडामोडी यावर मात करण्यासाठी वर्षभर सतर्क राहावे लागेल. स्वत:ची मर्यादा ओलांडू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. प्रवास घडेल. परदेशवारीही करण्याची शक्यता आहे.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....


गृहसौख्य व आरोग्यमान

webdunia

WD


गुरूचे पाठबळ चांगले लाभल्यामुळे छंद व व्यासंग जोपासून घरात खेळकर वातावरण ठेवता येईल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे, पण इतर ग्रहांची फारशी साथ नसल्यामुळे त्याचा तुम्हाला पुरेपूर आनंद घेता येणार नाही. नवीन वाहन, जागा खरेदी अशी कामे फेब्रुवारीपर्यंत पार पाडावीत. कर्जाचा बोजा वाढवू नका. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीकरिता किंवा उच्च शिक्षणाकरिता परदेशी जावयाचे आहे त्यांना फेब्रुवारीपर्यंत आणि त्यानंतर सप्टेंबरपर्यंतचा कालावधी चांगला आहे. मौल्वान वस्तू दागिने खरेदी करून घराचे ऐश्वर्य वाढविता येईल. मुलांकडून एखादी सुखद वार्ता कळेल. तीर्थयात्रा आणि प्रवास घडतील. फेब्रुवारी, मार्च, जूनमध्ये प्रकृतीची काळजी घ्यावी. मीन रास ही द्वीस्वभाव गुणधर्माची, जल तत्त्वाची जिचा अधिपती गुरू व नव्या विचारानुसार नेपच्यून आहे व चिन्ह दोन मासे आहेत.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi