सिंह राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल
नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...
नोकरदार मंडळींना जानेवारी, फेब्रुवारी किंवा जूननंतर बढती मिळेल. नोकरदार व्यक्तींच्या बर्याच वर्षाच्या इच्छा-आकांक्षा साकार करणारे वर्ष आहे. जूननंतर हळूहळू वरिष्ठ तुमच्यावर जबाबदार्या वाढवतील. गाडी किंवा घर आणि इतर सुखसुविधा खरेदी करून जोडीदाराला खूश ठेवाल. जूननंतर मात्र गुरू व्यवस्थानात जाईल. त्यामुळे हात आखडता घेणेच चांगले. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यंना फेब्रुवारी ते जून हा कालावधी विशेष चांगला आहे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...