Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा आठवडा आणि तुमचे राशीफल

हा आठवडा आणि तुमचे राशीफल

वेबदुनिया

WD
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात कर्ज मंजुरीची प्रतीक्षा राहील. विविध कारणास्तव अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयम ठेवणे उचित ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल व चांगली होईल व मनाला दिलासा मिळेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहू शकतील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल व काळजीचे सावट मिटू शकेल.

webdunia
WD
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात हातात पैसा खेळता राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत मिळतील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे उचित ठरेल.


webdunia
WD
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक स्वरूपाचा प्रवास योग घडेल व प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील व अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे कामे होतील. अंतिम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील समस्या समाधानकारकरीत्या मिटतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येतील. अधिकारी वर्गाने आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

webdunia
WD
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील प्रगती समाधानकारक स्थितीत राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या घडामोडी व घटना घडतील. काळजीचे सावट व दडपण काही प्रमाणात मिटेल व सर्वत्र यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात सार्वजनिक कामात सहभाग घ्यावा लागेल. तसेच कलावंत व्यक्तीचा इतरांकडून यथायोग्य मानसन्मान सत्कार सोहळा आयोजित केला जाईल व मानसिक आनंद वाढीस लागेल.


webdunia
WD
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व काळजीचे सावट वाढेल. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक स्वरूपाचे ठरू शकेल. प्रवासात दगदग व त्रास वाढेल. अंतिम चरणात शुभ व धार्मिक स्वरूपाचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरू शकेल. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल.

webdunia
WD
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा स्वीकार व विचार जरूर करावा. भावी काळात हितप्रद ठरेल. अंतिम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक ठरू शकेल. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामांचा अंदाज घेणे चांगले.

webdunia
WD

तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्यविषयक समस्या मिटण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील व आरोग्याची चिंता मिटेल. विरोधक मंडळींच्या कारवाया तूर्त स्थगित होण्याच्या मार्गावर राहतील. यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात सर्वत्र परिश्रमाशिवाय यश मिळणे अवघड स्थितीत राहील. काही बाबतीत जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरू शकेल.

webdunia
WD
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. स्पर्धा परीक्षेमधील निकाल समाधानकारक हाती येईल व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. दूर निवासी असणार्‍या प्रिय व्यक्तीचे अनुकूल व चांगले दूरध्वनी येतील व उत्साहवर्धक स्थिती प्रस्थापित राहील.

webdunia
WD

धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात कौटुंबिक आनंद वाढेल व पारिवारिक सदस्य मंडळीबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व कायम राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक चिंता मिटेल व संततीबाबत असणारी एखादी समस्या असेल तर मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येईल. सहकारी वर्ग अपेक्षेहेतुक सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहील.


webdunia
WD
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात नावलौकिक वाढविणारी कामगिरी हातून घडेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. कार्यसभोवतालीन परिस्थिती अनुकूल लाभदायक स्वरूपाची राहील. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळींच्या आग्रहाखातर काही प्रमाणात सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. कौटुंबिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व उत्साह वाढीस लागेल.

webdunia
WD
कुंभ : आर्थिक आवक सप्ताहाच्या प्रथम चरणात समाधानकारक स्थितीत ठेवणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास लाभदायक स्वरूपाचा कालखंड आहे. सर्वत्र यश मिळू शकेल. अंतिम चरणात क्रीडा क्षेत्रात मनोनुकूल यश मिळेल व बक्षीसपात्र कामगिरी हातून घडेल. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल.

webdunia
WD

मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक राहील व मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. बरेच दिवसापर्यंत आठवणीत राहील अशी एखादी चांगली घटना घडेल व उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता काही प्रमाणात राहील व आर्थिक स्थिती चढ-उतार स्वरूपातच राहू शकेल. इतरांकडून येणे असलेला पैसा हाती येण्याचे संकेत व सूचना मिळण्याची शक्यता आहे.

श्री. लक्ष्मण जोशी

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi