Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑगस्ट (2014) महिन्याचे भविष्यफल!

ऑगस्ट (2014) महिन्याचे भविष्यफल!
, शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (17:40 IST)
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) 
जानेवारी - नव्या महिन्यात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा, यामुळे आपले चित्त शांत राहील आणि येणारे कष्ट त्रासदायक ठरणार नाहीत. 
 
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) 
या महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील आवडीचा फायदा होईल. तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल.
 
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
थोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने तुमचे मन चिंतित राहू शकेल. अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो.
 
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग जुळत आहेत. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट रचत आहे, सावध राहा. मैत्री प्रेमात बदलण्याचे संकेत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही चांगले होईल. 
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे) 
महिन्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागेल. दीर्घ प्रवास विशेष फायदेशीर ठरणार नाही. आरोग्यही ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांना आपल्या सह-कर्मचारींच्या कट-कारस्थानांचा सामना करावा लागेल. 
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) 
तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतो आहे. मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा महिना आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही. 
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते) 
जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा.
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
महिन्याची सुरुवात झोकात होणार आहे. महिन्याचे उर्वरीत १५ दिवस फारच आनंददायक असतील. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि जीव ओतून काम करा, यश नक्कीच मिळेल. जोडीदाराचे वागणे आपल्याला नवे काम करण्यासाठी प्रेरणा देईल. एखाद्या मंदिरात दान केल्याने लाभ होईल.
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
हा महिना आनंद घेऊन येणार आहे, त्याचे स्वागत करा. नोकरदार लोकांना चांगली बातमी कळेल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. जीवनात नवा उत्साह संचारेल. शत्रूंवर विजय मिळवाल. वैवाहिक जीवन सुखद जाईल. जोडीदार तुमच्यासाठी ढालीसमान सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या चंचल मनावर नियंत्रण मिळवायला हवे, नाहीतर काही अडचणींचा सामना करावा लागेल. 
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
या महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. हो, जुने कोर्ट-खटले त्रासात टाकू शकतात. मन चंचल होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवा. अपत्याकडून चांगली बातमी समजेल. सासरकडून सुखद बातमी कळू शकते. नोकरी बदलण्याचे योग आहेत.
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
महिन्याची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत मतभेद होऊ शकतात. मुलांकडूनही त्रास मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावत राहील. 
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. गुंतवणुकीत आशानुरूप पैसे परत न मिळल्याने अशांती वाढेल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi