Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनू राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

धनू राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

वेबदुनिया

WD
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू, दशमस्थानाकडे येणारा मंगळ आणि लाभस्थानातील शनीचे वास्तव्य हे सर्व तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे विचार आचारांना सतत चालना मिळणार आहे. गाठीला काही महत्त्वाचे अनुभव ठेवून वागलात तर फायदा तुमचाच होईल. केव्हा क्रांतिकारक विचारांनी भारावून जाल, तर केव्हा अगदी व्यवहारी भाषेत बोलाल, मात्र गुरूची साथ जूनपर्यंत चांगली लाभत असल्यामुळे तुमच्याकडून काही चांगले कार्य सहज घडतील.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


धंदा, व्यवसाय व नोकरी

webdunia

WD


व्यापार उद्योगात काहीतरी नावीन्यपूर्ण करावे ही तुमच्यातील इच्छा तुम्हाला वर्षभर कार्यरत ठेवेल. संपूर्ण वर्ष आर्थिकदृष्टया बरकत करणारे ठरेल. देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडून कामात नोकरदार व्यक्तींना त्यांचे कौशल्य पणाला लावून उत्तम कामगिरी करता येईल. संस्थेच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. बदली किंवा थोडी गैरसोय जूननंतर संभवते. अतिश्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. महिला आपली जबाबदारी उत्तम पार पाडू शकतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....


गृहसौख्य व आरोग्यमान

webdunia
WD

कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे. लांबचा प्रवास, घरातील शुभकार्य, खरेदी यातून जीवनाचा एक वेगळा आनंद मिळेल. जूननंतर मात्र गुरू अष्टमस्थानात येणार असल्यामुळे तुमच्यावरचा जबाबदार्‍या वाढतील. फेब्रुवारी, मे व जूनमध्ये प्रकृतीच्या तक्रारी सोडल्या तर इतर वेळी तुमचा उत्साह व कामाचा उरक जबरदस्त राहील. तरुण-तरुणींना आपला जीवनसाथ निवडण्यात यश येईल. महिलांना कार्याची जबाबदारी पार पाडता येईल. फेब्रुवारी, मार्च, ऑगस्टमध्ये प्रवास ठरवावेत वा ग्रहमान लक्षात घेऊनच कार्यक्रम ठरवा. धनू रास ही द्वीस्वभाव गुणधर्माची अग्नितत्वाची आहे. जिचा अधिपती गुरू आहे व चिन्ह धनुष्य आहे. शुभरंग : ऑरेंज, गुलाबी शुभरत्न : पांढरा पुष्कराज व आराध्य दैवत नवनाथ आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi