Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुक्र अस्तामुळे विवाहेच्छुकांची होणार अडचण

शुक्र अस्तामुळे विवाहेच्छुकांची होणार अडचण
लातूर , मंगळवार, 24 जून 2014 (14:50 IST)
उरले फक्त ७ शुभ मुहूर्त
 
विवाहेच्छुकांनो, यंदा कर्तव्य असेल तर तत्काळ आटपून घ्या. ७ जुलैपर्यंतचे ७ मुहूर्त टळले तर डिसेंबरमधला एकमेव मुहूर्त वगळता पुढील वर्षीपर्यंत 'दोनाचे चार हात' होणे नाही. कारण शुक्र अस्त होणार असल्याने विवाहयोग्य मुहूर्तच नाहीत.
 
ज्योतिष-पंचांगानुसार जुलैमध्ये शुक्र अस्त होणार असल्याने शुभमुहूर्त नाहीत, तसेच देवशयनी अर्थात देव निद्राधीन होणार असल्याने कसलेही शुभकार्य करणे वज्र्य मानले गेले आहे. चालू महिन्यात शुभमुहूर्तांचा योग २४ जून व २५ जून असे फक्त दोन आणि जुलै महिन्यात १, २, ३, ६ व ७ हे पाच असे एकूण सातच मुहूर्त उरले आहेत. त्यामुळे विवाहेच्छुकांची अडचण होणार आहे. विवाह जमले असतील तर याच मुहूर्ताला आटपून घेण्याशिवाय दुसरे पर्याय फारच कमी आहेत. या सात तारखांना योग जुळून आले नाहीत तर वर्षभर अंगाला हळद लागण्याची शक्यता राहणार नाही. जुलै महिन्यातील पाच शुभमुहूर्तांनंतर थेट ६ डिसेंबरचा एकमेव मुहूर्त आहे.
 
देवशयनीमुळे मंगलकार्य वजिर्त असल्याने ८ जुलै ते २ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत आप्त-मित्रांना 'शादी के लड्ड' खाऊ घालता येणार नाहीत. ३ नोव्हेंबर रोजी तुळशीचे लग्न असले तरी त्या दिवशी अथवा त्यांनतरही विवाहयोग्य शुभमुहूर्त नाही. म्हणून विवाहेच्छुकांना २४ व २५ जून, १, २, ३, ६ व ७ जुलैची संधी हुकली तर यंदाच्या वर्षअखेरीस केवळ ६ डिसेंबरचा एकमेव मुहूर्त साधावा लागेल. डिसेंबरमध्ये एकमेव मुहूर्त असल्याने एकाच दिवशी मोठय़ा संख्येने विवाह उरकले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मात्र मंगल कार्यालय, कॅटरिंग, बॅण्डबाजा, डीजे, मंडप, पत्रिकांची छपाई ते अगदी ब्राह्मणांसून घोड्यापर्यंतच्या सोयी-सुविधांवर ताण येऊन वधुपिता व वरपित्याच्या नाकीनऊ येण्याची भीती आहेच.

Share this Story:

Follow Webdunia marathi