हा आठवडा आणि तुमचे राशीफल
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात कर्ज मंजुरीची प्रतीक्षा राहील. विविध कारणास्तव अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयम ठेवणे उचित ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल व चांगली होईल व मनाला दिलासा मिळेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहू शकतील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल व काळजीचे सावट मिटू शकेल.
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात हातात पैसा खेळता राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत मिळतील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे उचित ठरेल.