Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्क राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल

कर्क राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल
, मंगळवार, 30 डिसेंबर 2014 (12:37 IST)
कर्क राशीच्या जातकांना हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे. मंगळ, गुरु, शुक्र अनुकूल आहेत. गुरुचे भ्रमण राशीच्या चतुर्थात व पंचमात राहणार आहे त्यामुळे नशिबाचे पारडे जड होईल. तुमचे वय विवाहायोग्य झाले असले तर या वर्षी तुमचा लग्नयोग आहे. त्यामुळे तयार राहा! गुरुचे राशीतील आणि धनस्थानातील भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. त्याचबरोबर शुक्रही चांगली साथ देईल. या वर्षी तुमचा गमवलेला आत्मविश्वास पुन्हा तुम्ही मिळवू शकता. 
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : कामच्या बाबतीतही 2015 साल हे उत्तम असेल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. हा कालावधी तुमच्यासाठी अत्योत्तम असणार आहे, असे दिसते. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. पण हा प्रवास बहुधा निष्फळ ठरेल. जानेवारी 2015मध्ये कामाचा विस्तार कराल. कामामुळे व्याप वाढेल. परदेशगमन व परदेशव्यवहार यांच्या कामांना चालना मिळेल. जुलैपासनू पुन्हा एकदा काहीतरी नावीन्यपूर्ण काम केले पाहिजे असे तुम्हाला प्रकर्षाने वाटेल. बँक किंवा इतर मार्गाने पैसे उबलब्ध झाल्यामुळे आर्थिक अडचण भासणार नाही. मात्र त्याचा आवश्यक त्या कारणाकरिताच वापर करावा. 
 
नोकरीत फेब्रुवारी/मार्च 2015 पर्यंत कामाचा ताण वाढेल, त्यामुळे थोडे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष कराल. एप्रिल ते जुलै 2015 दरम्यान कामाची नवीन संधी चालून येईल. बदलीसाठी एप्रिल ते जून 2015 हा कालावधी अनुकूल आहे. त्यानिमित्त काहीजणांना परदेशी जाण्याची संधीही मिळेल. आपण केलेले काम चांगलेच असेले पाहिजे हा आग्रह तुमचे वेगळे अस्तित्व निर्माण करू शकेल. 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनात गुरूची कृपादृष्टी राहील. वर्षभर आनंददायी घटनांची नोंद होईल. तरुणांचे विवाह ठरण्यास व पार पाडण्यास संपूर्ण वर्ष अनुकूल आहे. नवीन वास्तूचे तसेच वाहन खरेदीचे स्वप्न जुलै ते सप्टेंबर या कालावधीत साकार होईल. तुमच्या प्रकृतीमध्ये उतार-चढाव दिसून येतील. याचा अर्थ तुम्ही आजारी पडालच असे नाही. फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हे वर्ष शुभ असेल. वर्षातील ९० टक्के कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल. थोडक्यात, शुभ घटनांची नांदी देणारे वर्ष आहे.  

शुभ रंग : तांबडा    
शुभरत्न : पोवळे  
आराध्यदैवत : गणपती   
उपाय: देवळात बदाम दान करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi