Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जानेवारी 2015 मध्ये तुमचे प्रेमसंबंध कसे राहतील?

जानेवारी 2015 मध्ये तुमचे प्रेमसंबंध कसे राहतील?
, रविवार, 28 डिसेंबर 2014 (20:51 IST)
मेष- या महिन्यात तुमच्या प्रेमळ जीवनात उतार-चढाव राहतील. संबंधामध्‍ये खूप उत्तेजित होऊ नका. जोडीदाराच्‍या भावनांचा विचार करा. महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत वैवाहिक जीवन सुखमय होईल.
webdunia

वृषभ- वृषभ राशीच्या जातकांना या महिन्यात प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. रोमांस किंवा मनोरंजनाच्या योजनेसाठी आपण पुढाकार घेऊ शकता. पत्‍नीला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. 
webdunia

मिथुन- प्रेमीयुगलांसाठी हा महिना फारच उत्तम असेल. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. मनोविनोदनात वेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल.
पुढे पहा कर्क, सिंह व कन्या राशींचे प्रेमसंबंध 
webdunia
कर्क- कर्क राशीची व्यक्ति या महिन्यात प्रेमावर विजय मिळविणार आहे. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
webdunia

सिंह- नव्या वर्षांतील पहिला महिन्यात रोमांससाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहतील. जोडीदाराकडून गिफ्ट मिळेल.
webdunia
कन्‍या- मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. 
पुढे पाहा तूळ, वृश्चिक आणि धनू राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध
webdunia

तूळ- आपल्या जोडीदाराबरोबर आपण उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष आकर्षित करतील. प्रेमसंबंध टिकवण्‍यासाठी हा पूर्ण महिना अनुकूल आहे.
webdunia

वृश्चिक- प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. विवाहासाठी प्रस्ताव येतील. दाम्पत्य जीवन सुखमय होईल.
webdunia

धनू- प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. 
पुढे पाहा मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध
webdunia

मकर- प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील. या महिन्यात तुम्हाल नवीन प्रेमासबंधी प्रस्ताव येतील परंतु निर्णय विचारपूर्वक घ्या. पती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे.
webdunia

कुंभ- पती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. पती-पत्नीतील मतभेद विकोपास न जाऊ देण्याची काळजी घ्यावी लागेल व व्यसनापासून दूर रहावे लागेल. प्रेमी युगलांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
webdunia

मीन- प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. नवीन नात्याची सुरुवात होईल. प्रेमासाठी हा काळ ठीक आहे. जोडीदाराकडून शुभ वार्ता समजेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi