Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेब्रुवारी महिन्यातील राशी भविष्य!

फेब्रुवारी महिन्यातील राशी भविष्य!

वेबदुनिया

मेष
या महिन्यात आपल्याला संभाळून राहण्याची आवश्यकता आहे. शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या शेवटी. सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. मित्र आणि नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वृष
हा महिना गोचर ग्रहानुसार मध्यमफळ देणारा दिसत आहे. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.

मिथु
इतर व्यक्तींच्या समस्येत उगीच हस्तक्षेप करू नका. व्यापारात पैसे गुंतविणे लाभदायक ठरेल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जेव्हा आपल्या विचारांनी काम होत नसेल तेव्हा एखाद्या योग्य आणि विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य करणे उचित ठरेल.

कर्
महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. बचत वाढेल. प्रेमींसाठी वेळ अनुकूल आहे. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही.

सिं
महिन्याचा आरंभ सामान्य असेल. आर्थिक पैलूकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीत वगैरे गुंतवणूक करणे टाळा. पत्नीचे आरोग्य चिंतेची बाब ठरू शकते. कामात मन लागणार नाही. फालतू गोष्टी मानसिक ताण निर्माण करतील. व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. नोकरदारांचा आपल्या वरिष्ठांशी वाद होऊ शकेल.

कन्या
महिन्याची सुरुवात चांगली होणार नाही. अपत्याकरवी त्रस्त होऊ शकता. आर्थिक स्तरावरही अडचणींचा सामना करावा लागेल. हो, महिना अखेरीस परिस्थितीत सुधारणा होईल. दूरून येणारी एखादी शुभ बातमी जीवनात उत्साह आणेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.

तुल
नवे घर खरेदी करू शकता. मानसिक चिंतेचे निवारण होईल. आर्थिक स्वरूपात लाभ होईल. शत्रूंना दुर्लक्षित करू नका. माहेराकडून दु:खद बातमी कळू शकते. दान दिल्यामुळे लाभ होईल.

वृश्चि
ह्रदयात प्रेमाचा अंकुर वाढेल. एखाद्या वाद-विवादात पडल्याने होणारे काम बिघडू शकते. कोणाचे मन दुखवू नका. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्याआधी सर्व पैलूंचा नीट विचार करा. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याचे संकेत आहेत. आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील.

धन
काम करण्यात मन गुंतणार नाही. चित्त अशांत राहील. मानसिक उलथा-पालथीचा महिना आहे. विद्यार्थ्यांना फार मेहनत करावी लागेल. आई-वडिलांशी वाद होऊ शकतो. शत्रू वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध भडकवू शकतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहण्यातच फायदा आहे. जोडीदाराचे आरोग्य चिंतीत करू शकते.

मकर
शारीरिक कष्ट होऊ शकतात. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.

कुं
मिळकतीत चढ-उतार कायम राहील. एखाद्याचे बेमुर्वत वागणे खिन्न करू शकते. तुमचे मौल्यवान सामान सांभाळून ठेवा, ते हरवण्याचे किंवा चोरी व्हायचे संकेत आहेत. नशीब तुमच्यासोबत नाही, त्यामुळे तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.

मीन
प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दया, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi