नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरूसारखा प्रभावी ग्रह राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झाला असल्यामुळे तुमच्या मनात कधी न येणारी आराम करण्याची भावना जागृत होईल. त्यामुळे नशिबाजे पारडे जड होईल. काही सुखद गोष्टी घडून येतील. मनोकामना पूर्ण होतील.
शनिचे भ्रमण आता अष्टम स्थानात होणार असून या स्थानात वर्षभर असणार आहे. अष्टम स्थानातील शनी तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवणारा असेल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापार उद्योगाच्या दृष्टीने नव्या वर्षात भरभराट होईल. बाजारातील चढाओढ, बदलते तंत्रज्ञान आणि अचानक घडणार्या घडामोडी यामुळे तुमचे नियोजन तुम्हाला लवचीक ठेवणे भाग पडेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.
पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन करार होतील. डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी गतिमान ठरेल. जानेवारी 2015 मध्ये कामाचा विस्तार कराल. कामामुळे व्याप वाढेल. एप्रिलपासून जूनपर्यंत तुम्ही अनेक महत्त्वाची काम हाताळू शकाल. पैशाची आवक साधारण राहील. एकंदरीत नवीन वर्षात तुमच्या अनेक चिंता/विवंचना मिटतील व तुम्ही थोडे निश्चिंत व्हाल.
अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन संभाव्य धोक्यांचा अंदाज घ्या. नोकरीत फेब्रुवारी / मार्च 2015 पर्यंत कामाचा ताण वाढेल, त्यामुळे थोडे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष कराल. बदलीसाठी एप्रिल ते जून 2015 हा कालावधी अनुकूल आहे. वरिष्ठांची मर्जीही तुमच्यावर असेल, त्यामुळे कमी श्रमात जास्त यश मिळवाल. नोकरीत तुम्हाला कितीही कंटाळा आला तरी वरिष्ठ स्वस्थ बसू देणार नाहीत. जून महिन्यापर्यंत तुम्हाला बरीच मेहनत करावी लागणार आहे. काही जणांना ऑगस्टनंतर परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल. जुलै ते ऑक्टोबर 2015 मध्ये पुन्हा आर्थिक घडी समाधानकारक राहील. जुलैनंतर गुरू आणि शुक्र या गोन ग्रहांची चांगली साथ मिळेल.
कलाकार आणि खेळाडूंनी त्यांच्या क्षेत्रातील घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवावे. मान-सन्मानाच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनात गुरूची कृपादृष्टी राहील. वर्षभर आनंददायी घटनांची नोंद होईल. महिलांचा मूड चांगला राहील. गृहिणींना मनाप्रमाणे वागता येईल. जानेवारी 2015 ते मार्चपर्यंत घरामध्ये एखादे शुभकार्य ठरून त्याची कार्यवाही लगेचच पार पडेल. तरुणांचे विवाह ठरण्यास व पार पाडण्यास संपूर्ण वर्ष अनुकूल आहे. नवीन वास्तू, जागा यांचा ताबा एप्रिल ते जून 2015 पर्यंत मिळेल. मार्च ते सप्टेंबर 2015 पर्यंत थोडी तब्येतीची काळजी घ्या. नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी अंतर राखून संबंध ठेवा. रक्तदाब व हृदयविकार किंवा इतर जुने आजार असतील तर बेसावध राहून चालणार नाही.
शुभ रंग : तांबडा
शुभरत्न : पोवळे