Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ष 2015 : काय म्हणतात तुमचे प्रेमसंबंध!

वर्ष 2015 : काय म्हणतात तुमचे प्रेमसंबंध!
, बुधवार, 17 डिसेंबर 2014 (12:36 IST)
वर्ष 2015 शुक्र प्रधान आहे. त्यामुळे 15चा मूलक (1+5=6) 6 येतो, जे शुक्र प्रधान आहे. शुक्र ग्रह आकाश मंडळात सर्वात सुंदर ग्रह आहे. हे प्रेम, कला, मनोरंजनाचा कारक असल्याने शुक्र प्रधान जातकांसाठी वरदान सिद्ध होईल.  

या वर्षात मुलींना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शुक्र सेक्सचा कारक असतो. जर तुमची राशी तुमच्या पार्टनरशी जुळत नसेल तर सांभाळून चाला. प्रेमात धोका होण्याची शक्यता आहे.  
 
वृषभ व तुला राशीचा स्वामी शुक्र आहे आणि यांची मित्र राशी मकर व कुंभ आहे, तसेच मीन राशी उच्चाची आहे. शत्रू ग्रह चंद्र आहे व चंद्राची राशी कर्क आहे. तसे कर्क राशीचे लोक भावुक असतात. यांच्यात दुराभावाची शक्यता नसते. सिंह राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
 
मंगळाची राशी मेष व वृश्चिक तुला राशीच्या लोकांना विशेष लाभदायक नसते. कन्या राशीत शुक्र नीचाचा असल्याने लाभ होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi