Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज तुमचा वाढदिवस आहे (17.02.2015)

आज तुमचा वाढदिवस आहे (17.02.2015)

वेबदुनिया

ज्या लोकांचा वाढदिवस 17 तारखेला असतो त्याचा मूलक 1+7 = 8 असतो हा ग्रह सूर्यपुत्र शनीद्वारे संचलित होतो. या दिवशी जन्म घेणारे व्यक्ती धीर गंभीर, परोपकारी, कर्मठ असतात. तुमची वाणी कठोर व स्वर उग्र असतो. तुम्ही भौतिकतावादी असता. तुम्ही अद्भुत शक्तीचे मालक आहे. तुम्ही जीवनात कुठलेही काम एक ध्येय समोर ठेवून करता. तुमच्या मनात काय सुरू असते हे जाणून घेणे फारच अवघड आहे. तुम्हाला यश संघर्षानंतर मिळतो. बर्‍याच वेळा तुम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसरे घेऊन जातात. 

शुभ दिनांक : 8 17, 26

शुभ अंक : 8, 17, 26, 35, 44

शुभ वर्ष : 2015, 2024, 2042

ईष्टदेव : मारुती, शनी

शुभ रंग : काळा,गडद निळा, जांभळा

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 8,17, 26 आहे त्यांना यावर्षी फारच अडचणींच्या सामोरे जावे लागणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यापार-व्यवसायात जुलैपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन कार्य योजनेत सांभाळून चालावे लागतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना लक्ष ठेवून काम करावे लागतील. आर्थिक बाबतीत संमिश्र स्थिती असेल. दांपत्य जीवनात सतर्कता ठेवावी लागेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शत्रू पक्ष प्रभावहीन होतील. जुलै नंतर स्थितीत सुधारणा होईल.

मूलक 8चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* गुरु नानक
* जार्ज बर्नार्ड शॉ
* राकेश बेदी
* डिम्पल कपाड़िया
* जावेद अख्तर

Share this Story:

Follow Webdunia marathi