कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष समिश्र घटनांचे राहील. गुरुची कृपा राहील, त्यामुळे चिंता नरू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन प्रगती करा. फार मोडी उडी तूर्तास घेऊ नका. नवीन ध्येयाने प्रेरित होऊन तुम्ही भरपूर काम कराल. आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याकरिता धाडस करण्याची तुमची तयारी असेल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : फेब्रुवारी 2015 पर्यंत फारशी उलाढाल होणार नाही, तरी गरजेनुसार कामाचे पैसे मिळतील. जे मिळालेले आहे त्यावर त्यांचे समाधान होणार नाही. तर जास्तीत जास्त मिळविण्याकरिता प्रयत्न चालू राहतील. या प्रयत्नांना फेब्रुवारी ते एप्रिल या काळात चांगला प्रतिसाद मिळेल. जुलैनंतर एखादे नावीन्यपूर्ण काम करून बाजारातील प्रतिमा उंचावता येईल. उत्पन्नात चांगली भर पडेल. पुढील 2015 च्या दिवाळीपूर्वी एखादी चांगली बातमी तुमच्या हुरूप व उत्साह वाढवेल.
नोकरीत नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या कलागुणांना वाव मिळत नाही असे वाटेल, पण थोडा संयम बाळगा. हितशत्रूंपासून थोडा त्रासही होण्याची शक्यता आहे. जुलैनंतर केलेल्या कामामुळे मोठ्या स्तरावरच्या पदासाठी तुमची नेमणूक होईल. त्याच वेळी परदेशीही जाता येईल. मात्र या सर्वांबरोबर मेहनत प्रमाणाबाहेर वाढेल आणि हितशत्रूची असूया जाणवेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्याने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. तुमची काहीशी फटकळ भाषा हे त्यासाठीच एक कारण असू शकेल. त्यामुळे शक्य तितके विनम्रपणे वागा. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे काहीसे तणावाखाली राहाल. पण खूप काळजी करण्याचे कारण नाही, कारण ही काळ पटकन निघून जाईल. तुम्ही कोर्टाकचेरीमध्ये व्यस्त राहाल. महिला व गृहिणींनी कर्तव्यदक्ष राहून सर्व आघाड्यांवर यशस्वी घोडदौड करावी, हे करताना स्वत:चा आवाका लक्षात ठेवावा. मुलांना प्रशिक्षणाकरिता वेगवेगळे पर्याय सुचवाल. त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना चांगली वाट दाखवाल. वृद्ध किंवा वडिलधार्या व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण साजरा करण्याकरिता जुलै ते नोव्हेंबर या दरम्यान आप्टेष्ट, नातेवाईक यांचा मेळावा लागेल. या वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये जवळीक निर्माण होईल. वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. तुम्हाला स्वर्ग केवळ दोन बोटे शिल्लक असेल.
शुभ रंग : निळा
शुभरत्न : हिरा
आराध्यदैवत : विष्णू
उपाय: देवळातील भटजींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करा.