Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॅरो 2015 राशीफल - टॅरो रीडिंग 2015

टॅरो 2015 राशीफल - टॅरो रीडिंग 2015
, मंगळवार, 23 डिसेंबर 2014 (10:54 IST)
मेष राशीचे टॅरो राशीफल 2015 (7 of cups, The Magician, Page of pentacles)
 
मेष टॅरो रीडिंग : टॅरोनुसार या वर्षी स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी निगडित बर्‍याच नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. पण या वर्षी कुठल्याही प्रकारची घाई करू नये. या वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे - खास करून नाक, कान आणि गळ्याशी संबंधित आजारांपासून बचाव करणे आवश्यक आहे. मेहनत केल्यास या वर्षी तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व मिळेल. जर कुणाला काही वचन दिले असल्यास ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दुसर्‍यांवर विश्वास ठेवा. ब्रेक-अप पासून बचाव करण्यासाठी एक मेकच्या विश्वास बनवून ठेवा. तसेच आपल्या प्रियकरांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.  
 
उपाय – काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे आणि कुत्र्यांना पोळी द्यावी.
 
वृषभ राशीचे टॅरो भविष्यफल 2015 
webdunia
वृषभ राशीचे टॅरो भविष्यफल 2015 (4 of Wands, The Hermit, Knight of Cups)
 
वृषभ टॅरो रीडिंग : बर्‍याच वेळापासून लांबणीवर असलेले पुरस्कार किंवा समारंभ या वर्षी होणे शक्य आहे. मनोरंजन आणि सैर सपाट्यासाठी भटकंतीसाठी हा काळ उत्तम आहे. टॅरो रीडिंग 2015नुसार या वर्षी तुम्ही नवीन घराची खरेदी करू शकता किंवा एखादे नवीन काम सुरू करू शकता. नवीन उमेदींमुळे हे वर्ष तुम्हाला उत्तम साबीत होणार आहे. कुठल्याही प्रकाराचे निर्णय घेण्याआधी नीट विचार करा. या वर्षी आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढेल. स्वतः:वर विश्वास ठेवून काम करा. टॅरोनुसार या वर्षी तुम्ही प्रेमात पडू शकता आणि त्यामुळे तुमच्या जीवन आनंदाने भरून जाईल. 
 
उपाय - लाल रंगाचे कपडे परिधान करावे आणि कर्मचार्‍यांना भोजन करावे.  

पुढे पाहा मिथुन राशीचा टॅरो भविष्यफल 2015
webdunia
मिथुन राशीचा टॅरो भविष्यफल 2015 (7 of Wands, Hanged Man, knight of Cups)
 
मिथुन टॅरो रीडिंग : या वर्षी तुम्हाला कामाचा ताण जाणवेल. आपले पाऊल विश्वासाने पुढे टाका आणि जीवनात सकारात्मकता आणा. ऑफिसमध्ये वाद-विवादांपासून दूर राहा. जर एखादे पारिवारिक संपत्तीशी निगडित प्रकरण सुरू असेल तर या वर्षी त्याचा निकाल लावणे जरूरी आहे. स्वतः:ला दोषी ठरवू नका. मन मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करा. ध्यान-धारणेचा अभ्यास करा आणि नकारात्मक ऊर्जेला दूर करा. आपले कुटुंब, मित्र आणि प्रियजनांसोबत वेळ घालवा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि जीवनाचा भरपूर आनंद घ्या.  
 
उपाय - पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान करा आणि रोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या. 

पुढे पाहा कर्क राशीचे टॅरो राशिफल 2015
webdunia
कर्क राशीचे टॅरो राशिफल 2015 (4 of Swords, 4 of Cups, 10 of Wands)
 
कर्क टॅरो रीडिंग : ह्या वर्षात तुम्ही अडचणी, आजारपण यापासून बाहेर निघण्यात यशस्वी व्हाल. हा वेळ थोडा आराम करण्याचा आहे. मागील केलेल्या चुका या वर्षी करून नका आणि नवीन विचारांना मनात आणा. उत्साहात थोडी कमतरता येईल पण लक्षात ठेवा नवीन संधी तुमची आतुरतेने वाट पाहतं आहे. नवीन कामात मन रमवा. टॅरो रीडिंग 2015च्या नजरेत नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. जर प्रेम प्रसंगात अडचण येत असेल तर परिजनांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका.    
 
उपाय - हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा, गायींना चारा खाऊ घाला आणि कुटुंबीयांसोबत वेळ घाला. 

पुढे पाहा सिंह राशीचा टॅरो भविष्यफल 2015
webdunia
सिंह राशीचा टॅरो भविष्यफल 2015 (4 of Wands, Ace of Pentacles, The Devil)
 
सिंह टॅरो रीडिंग : तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार पुरस्कार किंवा बढती हसील कराल. हा काळ रोमांच, जोष आणि मौज-मस्तीचा आहे. लग्न समारंभ किंवा एखाद्या आयोजनात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही कुठल्या दुसर्‍या ठिकाणी किंवा परदेश वारी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच त्याबाबत विचार करा. या वर्षी तुमच्यासमोर बर्‍याच संधी येणार आहेत. आपले ध्येय नजरेआड होऊ देऊ नका आणि आपल्या योजना अमलात आणा. प्रेम-संबंधांत नकारात्मक परिस्थितीपासून दूर राहा. आपले गुपित कुणाही समोर उघडू नका.  
 
उपाय - नारंगी/पिवळे रंगांचे कपडे परिधान करा. गायींना चारा खाऊ घाला आणि सूर्य देवाची आराधना करा.  
पुढे पाहा कन्या राशीचे टॅरो राशिफल 2015
webdunia
कन्या राशीचे टॅरो राशिफल 2015 (4 of Pentacles, 10 of Cups, 8 of Cups)
 
कन्या टॅरो रीडिंग : या वर्षी तुम्हाला तुमच्या कामात बराच बदल जाणवेल. सध्या जे तुमच्या हातात आहे त्यालाच धरून ठेवा. आधी तुम्ही जे कठोर श्रम केले आहे त्याचे पुरस्कार तुम्हाला या वर्षी नक्कीच मिळेल. म्हणून काही नवीन करण्याची गरज सध्या भासत नाही आहे. वर्षाअंती काही बदल घडून येतील. टॅरो रीडिंग 2015च्या दृष्टीत कुटुंबीयांसोबत सुट्या घालवाल. संबंधात आलेला दुरावा नक्कीच दूर होईल. आपल्या प्राथमिकतेवर जोर द्या. 
 
उपाय - काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका आणि मारुतीची उपासना करा. 
पुढे पाहा तुला राशीचे टॅरो राशिफल 2015
webdunia
तुला राशीचे टॅरो राशिफल 2015 (The Emperor, King of Cups, 7 of wands)
 
तुला टॅरो रीडिंग : या वर्षाअंती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहणार आहे, पण त्यासाठी तुमच्यावर बर्‍याच जबाबदार्‍या पडणार आहेत. वस्तूंना थोडं व्यवस्थित केल्यानंतर सर्वकाही सामान्य होईल. तुम्ही भावनेचा आहारी न जाता संतुलित राहण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही अशा व्यक्तीची मदत कराल जो खरंच अडचणीत असेल. जे तुम्हाला योग्य वाटेल त्याचे समर्थन करा आणि सकारात्मक जीवन जगा. नात्यांमध्ये तुम्ही दुसर्‍यांचा भावनांचा आदर कराल.
 
उपाय - काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे आणि मासोळ्यांना दाना द्या.
पुढे पाहा वृश्चिक राशीचा टॅरो राशिफल 2015
webdunia
वृश्चिक राशीचा टॅरो राशिफल 2015 (Temperance, 8 of Swords, 7 of Swords)
 
वृश्चिक टॅरो रीडिंग :  या वर्षी तुम्ही स्वतः:वर एखाद्या दैविक आशीर्वादाचा अनुभव घ्याल. एखादी दैविक शक्ती किंवा मोठा गुरू तुमची रक्षा करेल. व्यापारव्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे त्याने मानसिक संताप सहन करावा लागेल पण हा आशीर्वाद तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करेल. ह्या वर्षी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्यावर जबाबदारी जास्त राहील. टॅरो रीडिंग 2015 संकेत करत आहे की तुम्हाला जास्त एकाग्रता आणि संतुलित राहण्याची आवश्यकता आहे.  
 
उपाय - काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये आणि मारुतीची उपासना करावी. 

पुढे पाहा धनू राशीचा टॅरो राशिफल 2015
webdunia
धनू राशीचा टॅरो राशिफल 2015 (7 of swords, The High Priestess, Lovers)
 
धनू टॅरो रीडिंग : आधी केलेल्या चुकीच्या निर्णयांवर पश्चात्ताप न करून नवीन वर्तनाची आवश्यकता आहे. आपल्यावर नवीन उत्तरदायित्व येण्याची शक्यता आहे तर परिश्रमाने त्या जबाबदार्‍या उत्तमपणे पूर्ण कराल. अडचणीत असल्यास मोठ्यांचा सल्ला घेऊ शकता. मन-मर्जीने चालण्यापेक्षा योजना आखून कार्य करा. कुणाचे शारीरिक आकर्षणामुळे तुम्ही त्याच्याकडे ओढत जाल, पण यापासून स्वतः:चा बचाव करा. तसेच प्रेम प्रसंगात स्वतः:हून मोठ्या स्त्री/पुरुषाहून किंवा विवाहेतर संबंधांपासून दूर राहा.  
 
उपाय - पांढरे कपडे परिधान करा आणि इत्र/फुलांचा उपयोग करा. गरिबांना भोजन करवा.  

पुढे पाहा मकर राशीचे टॅरो राशिफल 2015 
webdunia
मकर राशीचे टॅरो राशिफल 2015 (Magician, World, 7 of Cups)
 
मकर टॅरो रीडिंग : आपल्या क्षमतेचा वापर करा. दिवास्वप्न पाहू नका. तुम्ही या वर्षी परिश्रम आणि योजना आखून सर्व काही मिळवू शकता. पण तुम्हाला नेहमी एक बेक-अप योजना आपल्या जवळ ठेवावी लागेल. आपल्या अंतरात्मेची आवाज ऐकून कार्य करा, ज्याने तुम्हाला नुकसान होणार नाही. यश तुमच्या दारी असेल. जर तुम्ही मद्यपान करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे.
 
उपाय - पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. गाय आणि कुत्र्यांना खाऊ घाला. 

पुढे पाहा कुंभ राशीच्या लोकांचे टॅरो राशिफल 2015
webdunia
कुंभ राशीच्या लोकांचे टॅरो राशिफल 2015 (Wheel of fortune, Ace of Swords, 8 of Cups)
 
कुंभ टॅरो रीडिंग : जे काही तुमच्या जवळ आहे, त्याला सांभाळून ठेवा आणि त्याचे आनंद घ्या. या वर्षी तुम्हाला अचानक नवीन संधी मिळेल. हा काळ आराम करण्याचा आहे. स्वतः:वर जास्त गर्व करू नका आणि आपल्या जुन्या चुकीपासून शिक्षा घ्या. या वर्षी तुमचे जुने संशय नक्कीच दूर होतील. कामात पूर्ण प्रामाणिक वागा. कुठल्याही नवीन संबंधात आपली प्राथमिकता निश्चित करणे गरजेचे आहे.    
 
उपाय - नारंगी कपडे परिधान करा आणि लहान मुलांना खाऊ घाला.

पुढे पाहा मीन राशीचे टॅरो भविष्यफल 2015
webdunia
मीन राशीचे टॅरो भविष्यफल 2015 (Ace of Swords, World, 2 of Pentacles)
 
मीन टॅरो रीडिंग : या वर्षी आपल्या हातून झालेल्या चुकीना मागे सोडत पुढची वाटचाल करा. शक्यझाल्यास कर्ज घेण्यास टाळा आणि मानसिक शांतीसाठी आर्थिक प्रकरणातून लवकरात लवकर पिच्छा सोडा. कामावर नियंत्रण ठेवा आणि जुने वचन दिले असल्यास ते पूर्ण करा. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत संयमाने वागता. जर नियमित अभ्यास कराल तर त्याचे उत्तम परिणाम समोर येतील. आपल्या जीवनातून नकारात्मक लोकांना दूर करण्याची ही वेळ आहे. ब्रेक-अपची शक्यता असली तरी मानसिक शांती भंग होणार नाही याची खबरदारी घ्या.  
 
उपाय - पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि गायींना चारा खाऊ घाला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi