Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळाचे कर्क राशीत प्रवेश, 12 राशींवर त्याचा प्रभाव

मंगळाचे कर्क राशीत प्रवेश, 12 राशींवर त्याचा प्रभाव
, मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (16:48 IST)
मंगळ ग्रहाने 30 जुलै पासून मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे प्रत्येक प्राणी प्रभावित होतात.  मग आम्ही जाणून घेऊकी ग्रहांच्या या परिवर्तनाचा कुठल्या राशीवर काय प्रभाव पडेल :-  
 

मेष राशीच्या जातकांचा चंद्रमा आठव्या स्थानातून अकराव्या स्थानात जाईल. पुढील काही दिवसांमध्ये त्याचा मिश्रित प्रभाव मिळेल. कार्यात कमीपणा आणू नका. भाग्याला कर्माचा साथ मिळेल, तर भाग्य तुमच्या पक्षात असेल. व्यापार आणि नोकरी दोघांमध्ये फायदा मिळणार आहे. जोडीदारासोबत यात्रेवर जाण्याचे योग घडून येत आहे. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे फारच आव
webdunia
श्यक आहे.  

वृषभ राशीच्या लोकांना राशी परिवर्तनाचे मिश्रित अनुभव मिळणार आहे. धन लाभ होण्याचे योग बनत आहे पण धन जसे येईल तसेच जाईल देखील. नुकसान होणार नाही. कार्यांना गती मिळेल पण सावध राहणे फारच गरजेचे आहे. दांपत्य जीवन सामान्य राहील.  विचार करून बचत केल्याने धन लाभ होईल. कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
webdunia
मिथुन राशीच्या जातकांचा चंद्र अर्थात धनस्वामी या सात दिवसांमध्ये सहाव्या घरातून नवव्या घरात जाईल. लांबच्या पल्ल्याचा प्रवास फायदेशीर ठरेल. राशीचा चंद्र भाग्य भावात असेल जो शुभ फल देईल. रोमांससाठी वेळ अनुकूल आहे. व्यापारात फायदा मिळेल.कुटुंबातील एखाद्या महिला सदस्याच्या आरोग्याविषयी थोडी काळजी राहील.  

webdunia
कर्क राशीच्या जातकांना सहावा चंद्र शत्रूवर विजय मिळवून देईल. कुटुंबात ताण तणाव राहण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. व्यापारात अडकलेला पैसा मिळवण्यात थोडा त्रास संभवतो. नोकरी करणार्‍या लोकांना धन लाभ अवश्य मिळेल. आरोग्याबाबत हा आठवडा थोडा काळजीचा राहील.  

webdunia
सिंह राशीच्या जातकांचे चंद्र चवथ्या भावातून सातव्या भावात जाईल. मान सन्मानात वाढ होईल. नोकरीत उच्च पद मिळेल. व्यापारात  अनिश्चितता राहील. वैवाहिक संबंधांसाठी प्रस्ताव मिळतील. प्रेम प्रस्ताव यशस्वी ठरतील. हृदय रोग असणार्‍या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे.
webdunia
कन्या राशीच्या जातकांचा चंद्र पराक्रम भावातून सहाव्या स्थानात जाईल. चांगला काळ सुरू झालेला आहे. व्यापार-व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. दांपत्य सुख मध्यम राहील. आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. पोटाशी निगडित आजार जसे - अजीर्ण, गॅसमुळे त्रास संभवतो.  
webdunia

 
तुला राशीच्या जातकांसाठी वेळ उत्तम ठरणार आहे. वाणीवर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. सासरपक्षाकडून मदत मिळेल. जोडीदाराशी संबंध उत्तम राहील. चवथा चंद्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्रास देऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे.  
webdunia

वृश्चिक राशीच्या लोकांचा चंद्र आठवड्याच्या सुरुवातीत लग्नामध्ये राहील. महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अडचणी येऊ शकते. संतानं सुख मिळेल. स्थायी संपत्ती खरेदीचे योग घडून येत आहे. या आठवड्यात आरोग्य नरम गरम राहील. मानसिक तणाव राहणार आहे, म्हणून जास्त विचार करू नका.
webdunia
धनू राशीच्या लोकांचा चंद्र पत्रिकेतील व्यय भावातून धन भावातून होत पराक्रम भावात जाणार आहे. दुसर्‍यांच्या कामात अडथळे आणल्यामुळे विवादाची स्थिती निर्मित होऊ शकते. प्रतिष्ठा वाढेल. व्यापार-धंद्यातील तणाव संपुष्टात येईल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी वेळ अनुकूल नाही आहे. आरोग्य उत्तम राहील.  

webdunia
मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ फारच शुभदायी ठरणार आहे. नवीन वाहन खरेदीचे योग जुळून येत आहे.  नोकरीत बढतीचे योग बनत आहे. चंद्र तुमच्याच राशीतून कुंभ राशीत जाणार आहे. दांपत्य जीवनासाठी हा वेळ अनुकूल नाही आहे. सर्दी पडसं, ताप येण्याची शक्यता आहे.

webdunia
कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. मोसमी आजार त्रास देऊ शकतात. नोकरीत अडचणी येण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवन सामान्य राहील. राजनैतिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. चंद्र तुमच्या राशीत येईल तेव्हा उत्तम वेळ जाईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ उत्तम जाणार आहे. आधी केलेल्या श्रमाचे उत्तम फळ मिळेल.  

webdunia
मीन राशीच्या जातकांसाठी हे परिवर्तन फायदेशीर ठरणार आहे. शत्रूंवर विजय मिळवाल. गुंतवणूक करताना विचार करा. संतानं सुख मिळेल. विरोधी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. दांपत्य जीवनात त्रास संभवतो. आठवड्याच्या शेवटी धनलाभ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi