मकर राशीची राश्याधिपती शनी तुमच्या लाभस्थानात येणार आहे. या व्यक्तींसाठी 2015 सालातील पहिले सहा महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहील. कामाच्या ठिकाणी सर्व काही सकारात्मक राहील. हा तुमच्यासाठी जल्लोष साजरा करण्याचा काळ आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. हे ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढवणारे आहे. प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहण्याकरिता तुम्ही रात्रीचा दिवस कराल. काही सुखद गोष्टी घडून येतील. मनोकामना पूर्ण होतील.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : नव्या वर्षात तुम्हाला सगळीकडूनच सहकार्याचा हात मिळेल. स्पर्धेत टिकनू राहण्यासाठी तुम्ही खास बेत ठरवाल, त्यात सफलता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. जी संधी हातातून निसटली होती ती पुन्हा एकदा डिसेंबरनंतर दृष्टिपथात येईल. त्यावर तुम्ही झडप घालाल. त्यामुळे प्रगतीबरोबरच आर्थिक लाभही मिळतील.
नोकरदार व्यक्तींना फेब्रुवारी/मार्च 2015 पर्यंत कामाचा ताण वाढेल, त्यामुळे थोडे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष कराल. एप्रिल ते जुलै 2015 दरम्यान कामाची नवीन संधी चालून येईल. बदलीसाठी एप्रिल ते जून 2015 हा कालावधी अनुकूल आहे. वरिष्ठांची मेहेरनजर तुमच्यावर असेल, त्यामुळे कमी श्रमात जास्त यश मिळेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनात दूरच्या प्रवासाचे बेत करावेसे वाटतील. पण खर्चात काटकसर करायला तुम्ही विसरणार नाहीत. तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र सोडून सहसा फार काळ लांब जात नाही. पण एखादा चांगल्या निमित्ताने तुम्ही प्रवासाचे बेत कराल. घरातील व्यक्तीच्या जीवनातील चांगल्या क्षणाचा आनंद घ्याल. नवीन वास्तू, जागा यांचा ताबा एप्रिल ते जून 2015 पर्यंत मिळेल. मार्च ते सप्टेंबर 2015 पर्यंत थोडी तब्येतीची काळजी घ्या.
तुमचे लग्नाचे वय झाले असेल तर 2015 सालात या बाबतीत काही सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूपच अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न निश्चित यशस्वी होणार आहेत. असे असले तरी 2015 सालातील उत्तरार्ध मात्र काहीसा कठीण असेल. त्यावेळी गुरू तुमच्या आठव्या घरात असेल. परिणामी, आर्थिक समस्या उद्भवतील. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. महिलांचा मूड चांगला राहील. गृहिणींना मनाजोगते वागता येईल.
शुभ रंग : तांबडा
शुभरत्न : पोवळे
आराध्यदैवत : गणपती
उपाय: दर चार महिन्यांनी शेंडी असलेले नारळ वाहत्या पाण्यात सोडा.