Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वृश्चिक राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल

वृश्चिक राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल
, मंगळवार, 30 डिसेंबर 2014 (14:07 IST)
वृश्चिक राशीतील लोकांच्या कुंडलित नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शनी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे, पण गुरुचे भाग्यस्थान आणि दशमस्थानातील भ्रमण तुम्हाला तुमच्या अडचणीवर मात करायला मदत करेल. कोणताही निर्णय घेताना त्याविषयीचे विचारमंथन तुमच्या मनात बराच काळ चालेल. व्यवहारिक दृष्टिकोन ठेवून व स्वत:ची कुवत ओळखून काहीतरी भव्यदिव्य करायचे असे मनात असेल व ते तुम्ही करू शकाल, त्यामुळे तुमचे यश द्विगुणीत होईल. 
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....   
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यवसायात फेब्रुवारी 2015 पर्यंत तुमच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात साकार होतील. राशीतील शनी व्यापारीवर्गाला कडतर आहे, पण गुरुचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे खूप चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी स्वत:च्या आर्थिक  आणि इतर मर्यादा लक्षात घेऊन कामाचे योग्य ते नियोजन करावे. जून, जुलैनंतर विशेष कमाईची एखादी संधी चालून येईल. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. 
 
नोकरीमध्ये चित्र थोडे वेगळे दिसतील. कष्टाशिवाय फळ नाही असे अनुभवास येईल. कामे मिळविण्यासाठी बरीच धडपड करावी लागेल. जुलै ते सप्टेंबर 2015 मध्ये विशेष लाभदायी घटना घडतील. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. केलेल्या कामाचे समाधान व आनंद मिळेल. कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. संस्थेमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवून जणू काही तुमची परीक्षाच पाहातील. त्यात सफल झालात तर त्याचे चांगले फळ मिळेल. 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक सौख्य राहील. प्रेमाच्या संदर्भात 2015 हे वर्ष उत्तम राहील. शनि प्रथम स्थानात आल्यामुळे वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण होतील. काही वेळाप्रेमासाठी झुरणेही चांगले असते. त्याचप्रमाणे तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी सतावतील. काळजी करू नका, काहीही गंभीर घडणार नाही. घरामध्ये जानेवारी ते जून यादरम्यान येणार्‍या समस्यांमुळे तुचा थोडाफार गोंधळ उडेल, पण त्यावर तुम्ही शांतचित्ताने विचार करून चांगला मार्ग काढ शकाल. हा काळ कामासाठी चांगला आहे. 
 
त्यामुळे कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी हा काळ खूपच चांगला असेल. या वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायाशी निगडीत शिक्षण घेणाऱ्यांची प्रगती होईल. तरुण वर्ग जूनपर्यंत प्रत्येक निर्णय घेताना साशंक असतील. त्यानंतर त्याची उमेद वाढेल. गृहिणी व महिलांना स्वत:चे अस्तित्व सिद्ध करता येईल. मुलांकडून सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची नस पकडता येईल, त्यामुळे उत्तम कामगिरी करू शकतील.
 
शुभ रंग : पिवळा  
शुभरत्न : टोपाझ       
आराध्यदैवत : राम        
उपाय: माकडांची सेवा करा आणि मांसाहार व मद्यप्राशन टाळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi