Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वृषभ राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल

वृषभ राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल
, सोमवार, 29 डिसेंबर 2014 (17:59 IST)
वृषभ राशीच्या लोकांना या सवर्षी संमिश्र फळ देणारे ग्रहमान लाभेल, त्यामुळे आशा-निराशेचा खेळ चालू राहील. गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. शनी आणि गुरु या दोन ग्रहांची तुम्हाला वर्षभर उत्तम साथ मिळणार आहे. 
 
ज्या उद्दिष्टांमध्ये तुम्हाला बरीच धावपळ करून फारसे यश मिळाले नव्हते त्याल आता आशादायक कलाटरी मिळाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागाल. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन प्रगती करा. फार मोठी उडी तूर्तास घेऊ नका. तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडालच, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. 
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी....  : व्यवसायाबद्दल सांगायचे झाल्यास, हे वर्ष अत्यंत उत्तम असणार आहे. फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या उपकरणांवर थोडासा खर्च होईल. फेब्रुवारी 2015 पर्यंत फारशी उलाढालहोणार नाही, तरी गरजेनुसार कामाचे पैसे मिळतील. मार्च 2015मध्ये एखादी चांगली घटना घडेल व कामात होणारे बदल अनुकूल ठरल्याने तुम्हाला स्फूर्ती मिळेल. एप्रिल ते जुलै हा कालावधी आर्थिकदृष्टया विशेश लाभदायी ठरेल. छोटा व्यावसायिकांना चालू असलेल्या कमाव्यतिरिक्त काही तरी वेगळे काम करण्याची संधी मिळेल. 
 
पैशाची आवाक मनाप्रमाणे राहील. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 दरम्यान प्रगती थोडी संथ राहील. पुढील 2015च्या दिवाळीपूर्वी एकादी चांगली बातमी चुमचा कानी पडेल. 
 
नोकरीत व्यक्तींना एखाद्या विशिष्य कामानिमित्त संधीची प्रतीक्षा असेल, पण तोडा संयम बाळगा. हितशत्रूंपासून थोडा त्रासही होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये चांगले काम करून वरिष्ठांना खूश करता येईल. या सगळ्याचा परिणाम म्हणून मे ते जुलै या दरम्यान विशेष सवलती, पगारवाढ किंवा थोड्या अवधिकरिता परदेशात काम करण्याची संधी मिळेल. नोकरीत बदलीसाठी मार्च, मे, जून, सप्टेंबर अनुकूल आहेत. 
 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्ष चांगले आहे. येणार्‍या जबाबदार्‍या पेलण्यासाठी सिद्ध व्हा. वृद्धांनी कर्तव्यतत्पर राहावे. घरातील वातावरण आंनदी राहील. जानेवारीमध्ये कुटुंबीयांसह लांबचा प्रवास घडेल. एप्रिल ते जुलै या दरम्यान घरातील शुभकार्याची नांदी होईल. नवी जागा किंवा वहान खरेदीचे स्वप्न जुलै ते पुढील दिवाळीपर्यंत पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना वर्ष अनुकूल आहे. ज्यांना उच्च शिक्षणाकरिता जायचे आहे त्यांना जायला मिळेल. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी व्यक्ती त्यांच्या क्षेत्रातील स्पर्धकांना मागे टाकून स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करू शकतील. वृद्धांनी प्रकृतीची हेळसांड करू नये. महिला व गृहिणींनी कर्तव्यदक्ष राहून सर्व आघाड्यांवर यशस्वी घोडदौड करवी, हे करताना स्वत:चा आवाका लक्षात ठेवावा.  
 
शुभ रंग : गुलाबी, निळा 
शुभरत्न : हिरा 
आराध्यदैवत : विष्णू 
उपाय: काळ्या रंगाच्या गायीची सेवा करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi