Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक भवष्यिफल 2 ते 8 ऑगस्ट 2015

साप्ताहिक भवष्यिफल 2 ते 8 ऑगस्ट 2015
, शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (16:57 IST)
मेष : हा आठवडा तुमच्यासाठी फारच सुख, शांती आणि प्रगतिदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे  अडकलेल्या कामांना गती मिळणार आहे अशी शक्यता आहे. तुम्ही कार्याची प्रगती पाहून निश्चित व्हाल. तुमचा समाजात सन्मान वाढेल. पण तुमच्या राशीवर सध्याशनीचा ढैय्या असल्या मुळे अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून थोडे सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. तुम्ही घाई गडबडीत तुमचे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्याने तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून सावध राहा.

वृषभ : या आठवड्यात तुमचे सहलीचे योग योग बनत आहे. तुम्ही एखादे धार्मिक स्थळ किंवा हिल स्टेशनाची यात्रा करू शकता. हा प्रवास तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी निगडित असू शकतो, अशी शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन करार करण्यास व्यस्त असाल तसेच तुम्हाला प्रदर्शनी किंवा सेमिनारमध्ये जाण्याचा मोका मिळेल. व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला लांबच्या प्रवास किंवा विदेश यात्रेचे योग आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्याचे विचार करू शकता. पण या आठवड्यात तुमचे विरोधी सक्रिय होतील.

मिथुन : तुम्ही तुमच्या आरोग्याचीकाळजी घ्या, अन्यथा जुने आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. 2 आणि 3 तारखे दरम्यान जमीन, घर, स्थायी मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येत आहे. नोकरी करणार्‍या जातकांसाठी हा  आठवडा फार अनुकूल असून पदोन्नती तसेच पगारवाढ होण्याची शक्यताआहे. कार्यालयात तुमचा प्रभाव वाढेल. कंपनीकडून तुम्हाला बरीच सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : बर्‍याच वेळापासून अडकलेले सरकारी कार्यांना आता गती येईल. उच्च आधीकारी आणि प्रभावी व्यक्तीच्या मदतीने कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आठवडाभर आनंदात राहणार आहे. या आठवड्यात जुने वाद विवाद संपुष्टात येण्याचे दिसत आहे. संबंधांमध्ये पारदर्शकता येईल. प्रायव्हेट किंवा सरकारी नोकरीत बदलीचे योग आहे. घराची दुरुस्ती, पेंट, फर्निचर आणि इतर कार्य करण्याचे योग आहे. तुम्ही घरात सुख सुविधांची वस्तू खरेदी कराल.

सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात फारच चांगली होणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्हाला थोडे निश्चित व्हाल. सामाजिक कार्यांमध्ये तुमच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आल्यामुळे तुम्ही त्यात सक्रिय व्हाल. या आठवड्यात तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे पण तुम्ही केलेल्या प्रयत्नांना अद्याप यश मिळणार नाही. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

कन्या : आठवड्यात तुम्हाला लहान सहानं ऑपरेशन करावे लागणार आहे. उद्योगाच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल आहे. या वेळेस व्यवसाय विस्तार संबंधी योजना यशस्वीपूर्वक पार पाडाल. लोन किंवा एखाद्याला उधार दिलेले पैसे वेळेवर परत येतील. नोकरी करणार्‍या लोकांना आकस्मिक धन लाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला मित्र किंवा भागीदारांमुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सुरू असलेले विवादित प्रकरण संपुष्टात येणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. वारसा मालमत्तेशी निगडित प्रकरण सुटतील.

तूळ : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे भाग्योदय होणार आहे. तुमची मानसिक काळजी दूर होईल. तुम्ही संपूर्ण आठवडा कामात गुंतलेले असाल. या आठवड्यात तुमची फारच धावपळ होणार असली तरी तुम्ही केलेली मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात नक्कीच मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला फक्त तुमच्या प्रतिस्पर्धांशी सावध राहण्याची गरज आहे कारण तुमचे विरोधी तुम्हाला खाली दाखवण्याच्या प्रयत्नात असतील. घरात पाहुण्यांचे येणे जाणे सुरू राहील.

वृश्चिक : या आठवड्यात भाऊ बहिणींशी तुमचे संबंध आधीपेक्षा जास्त सुमधुर होतील. जर संबंधांमध्येआधीपासून मतभेद सुरू असतील तर या आठवड्यात ते सर्व संपुष्टात येतील. तुम्हाला सामाजिक समारंभात जाण्याचे योग येतील. त्यामुळे तुमची ओळख अधिक वाढेल. या आठवड्यात कमी किंवा जास्त प्रमाणात तुमचा प्रवासाचा योग येत असून तुम्ही धार्मिक स्थळाची यात्राही करू शकता. तुम्ही घरात सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी केल्यामुळे तुमचे कुटुंब आनंदात राहतील. आणि हे सर्व बघून तुम्हाला त्याचे समाधान वाटेल. तुम्ही नवीन वाहन खरीदी करू शकता. या आठवड्यात तुमचे बँक बॅलेस वाढणार आहे.

धनू : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवेल. बर्‍याच दिवसांपासून लांबणीवर असलेले काम पुढे सरकत नसल्याने त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होईल. तसेच तुम्ही इतर दुसर्‍या कार्यांवर आपले लक्ष केंद्रित कराल. त्याचा परिणाम तुमच्या कामाच्या प्रदर्शनावर पडेल. या आठवड्यात कौटुंबिक प्रकरणांमध्ये तुम्ही अडकू शकता. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखून ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. संपत्ती किंवा पारिवारिक संपत्तीचे प्रकरण न्यायालयात पोहचण्याची शक्यता आहे.

मकर : मागील आठवड्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्यवसायात प्रगती कराल. पण गणेशजींचा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाचे विस्तृतीकरण किंवा नवीन उद्यम सुरू करण्यासाठी सध्या गुंतवणूक करू नका. बाजारात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे तुम्ही पूर्ण आठवडा अस्वास्थ्य राहाल. तुम्ही तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि कार्याप्रती समर्पण भाव ठेवल्याने त्यात यश मिळवाल. जमीन, घर, वाहन इत्यादींची खरेदी करू शकता. स्थायी मालमत्तेत जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केले तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सरकारकडून कुठल्याही स्वरूपात लाभ मिळू शकतो.

कुंभ : या आठवड्याच्या सुरुवातीत गुरू आणि शनी तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये उत्तम लाभ देईल. तुम्हाला उद्योगात निरंतर फायदा होणार आहे. जर तुम्ही व्यवसायाला पुढे वाढवायचा विचार करत असाल तर त्यात निश्चित पुढे वाढू शकता. नवीन जागा, इंडस्ट्रियल पार्क, रिअल एस्टेट, संयंत्रासाठी शेड किंवा नवीन दुकानासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. विवाहासाठी उत्सुक असणार्‍या जातकांसाठी हा वेळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन स्थळ येण्याची शक्यता आहे. लग्नाची गोष्ट पुढे जाऊ शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या स्पर्धकांवरविजय मिळवाल.

मीन : या आठवड्यात तुम्हाला भरपूर काम असले तरी त्यातून वेळ काढून तुम्ही कुटुंबीयांसोबत एखाद्या सुंदर जागेवर फिरायला जाऊ शकता ज्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. शासकीय खात्याशी निगडित कार्य लवकरच संपुष्टात येतील. जर तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती देखील या आठवड्यात संपुष्टात येईल. विद्यार्थी वर्ग आणि नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा आठवडा फारच उत्साहपूर्ण जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात मदत मिळेल आणि त्यामुळे तुमचा मनोबला वाढेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi