Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक भविष्यफल 3 ते 9 मे 2015

साप्ताहिक भविष्यफल 3 ते 9 मे 2015
, शनिवार, 2 मे 2015 (17:42 IST)
मेष: आठवड्याची सुरुवात जशी पाहिजे तशी होणे शक्य नाही आहे. या वेळेस तुमच्या कार्यात अवरोध होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बर्‍याच बाबतीत तुमची स्थिती भ्रमक सारखी राहणार असून तुमच्या कल्पने विरुद्ध परिणाम येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या आठवड्यात मनोरंजन व भोगविलासाच्या वस्तूंवर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता दिसत आहे, म्हणून गणेशजी प्रमाणे तुम्ही तुमच्या हातात आधीपासून थोडे पैसे शिल्लक ठेवण्याचा सल्ला देत आहे. बौद्घिक चचेपासून थोडे दूर राहिल्यास उत्तम कारण या काळात तुमच्या शब्दांचा वेगळ अर्थ काढण्यात येणार आहे. 
 
वृषभ: आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी फारच उत्तम असणार आहे. या काळात तुम्हाला परदेशातील ओळक असणार्‍या लोकांशी व महिलांशी लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहासाठी उत्सुक लोकांसाठी हा काळ उत्तम आहे, जर कुठे विवाहाची बोलणी सुरू असेल तर तेथून सकारात्मक संकेत मिळण्याची उमेद आहे, म्हणून मन प्रसन्न राहील. त्यामुळे तुमचे मन चंचल राहण्याची शक्यताही नकारता येत नाही. या आठवड्यात तुम्ही मुशाफिरती जास्त वेळ घालवाल म्हणून तुमच्या खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून खर्चाकडे थोडे लक्ष्य द्या.
 
मिथुन: आठवड्याचा प्रारंभ व्यावसायिक बाबींमध्ये थोड भ्रमित करणारा असणार आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत थोडे फार मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला उधारी वसूलणीसाठी थोडा इंतजार करावा लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला भाग्याचा साथ मिळणार आहे, पण तुम्ही त्याचा योग्य वापर करण्यास अपयशी व्हाल. या आठवड्यात तुम्ही कुठल्या प्रकारच्या कार्याची खोज किंवा व्यवसाय संबंधी यात्रेचे योग जुळून येत आहे, त्याचा फायदा द्या. आठवड्याच्या मध्यात आयात आणि निर्यातातील व्यवसायातील निगडित लोकांसाठी अनुकूल आहे. या वेळेस तुमच्या घरात मांगलिक प्रसंग होण्याची शक्यता आहे. 
 
कर्क: आठवड्याचा प्रारंभ गणेशजी प्रमाणे थोडा विपरिक काळ आहे, असे दिसून येत आहे. या काळात तुमच्या उग्रतेचा प्रमाण अधिक बघायला मिळेल आणि संबंधांत प्रेम भावात कमतरता येण्याची शक्यता दिसत आहे. ज्यामुळे येणार्‍या काळात तुमचे संबंध ताणतणावातील राहण्याची अधिक शक्यता आहे. या आठवड्यात तुमचा वैवाहिक जीवनात उत्साहाची कमी राहणार आहे. बायको किंवा मुलाचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत टाकू शकतात. जर तुमचा व्यवसाय भागिदारीत असेल, या आठवड्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचा नवीन निर्णय घेण्यास टाळा. या वेळेस तुम्हाला अस ही जाणवेल की भाग्य तुमच्या बरोबर नाही आहे. या काळात तुम्हाला व्यापारत तुमच्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी नेहमी तयार राहवे लागणार आहे. 
 
सिंह: सिंह जातकांच्या व्यक्तींसाठी हा आठवडा फारच आनंदाचा जाणार आहे. तुम्ही संपूर्ण आठवडा नवीन जोश आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घेणार आहात. या काळात तुम्ही विपरीत लिंगी प्रती आकर्षित व्हाल, पण तुम्हाला अनैतिक संबंधांपासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कृषि संबंधित उत्पादन, रियल एस्टेट, लाल रंगांच्या वस्तुंच्या व्यापार करण्यास तुम्हाला अनुकूल ठरणार आहे, मग व्यवसाय सुरू करताना हे नक्की लक्षात ठेवा. नोकरी करणार्‍या लोकांवर त्यांच्या उच्च अधिकार्‍यांची कृपा दृष्टि संपूर्ण आठवडा राहणार आहे. 
 
कन्या: या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला एखादी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. तुमची सृजनात्मक क्षमतेत वाढ होईल. मौजमजेत आठवडा व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. गणेशजींच तुमच्यासाठी असा सल्ला आहे की तुम्हला बचतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे, अन्यथा येणार्‍या काळात तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आठवड्याच्या मध्यमात तुम्ही अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला आहे. 
 
तूळ : या आठवड्यात तुम्ही करियरपेक्षा तुमच्या निजी संबंधांवर जास्त लक्ष द्याल. आठवड्याच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही विपरीत लिंगीकडे अधिक आकर्षित व्हाल. तुम्ही तुमच्या प्रियकारासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी आतुर असाल. या बाबतीत पुढे जाण्यास वेळ उत्तम आहे पण पाचव्या घरात शुक्र सोबत मंगळाची युती असल्यामुळे तुमच्या स्वभावात उग्रता येईल, ज्यामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला या आठवड्यात मनासारखे परिणाम मिळविण्यासाठी फार मेहनत करण्याची आवश्यकता पडेल. गणेशजींच्या मतानुसार तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या खोलीत सरस्वती देवीचे फोटो ठेवल्याने नक्कीच फायदा होईल. 
 
वृश्चिक: आठवड्याच्या सुरुवातीस कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. एकीकडे आवक कमी होईल आणि दुसरीकडे तुमचा कल भौतिक सुख सुविधांकडे जास्त राहण्याची शक्यता आहे.  त्याशिवाय तुमच्या स्वभावातील उग्रता तुमच्या संबंधात तणाव निर्माण करण्यात मुख्य भूमिका करणार आहे. आरोग्यासंबंदी समस्या तुम्हाला कष्टकारक ठरणार आहे, विशेष करून नेत्र पीडा, छातीचे दुखणे इत्यादी. प्रेम प्रसंगात पुढे जाण्यासाठी आठवड्याचा सुरुवातीचा काळ उत्तम नाही आहे. तुमच्यात या आठवड्यात अधिक उत्साह आणि साहस राहणार आहे, पण तुम्हाला असा सल्ला देण्यात आला आहे की कुठल्याही दिशेत पुढे जाण्याअगोदर प्रत्येक पक्षाचा पूर्णपणे विचार करून पुढे जा.
 
धनु: या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वाणीवर खासकरून संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. या काळात तुम्ही तुमचा कम्युनिकेशन स्पष्ट ठेवा, नाही तर तुमच्या शब्दांचा वेगळा अर्थ काढण्यात येईल. उच्च अधिकार्‍यांसोबत तुमचे संबंध नाजुक राहण्याची शक्यता आहे. उद्योग धंद्यातील निगडित लोकांना आर्थिक तंगी राहण्याची शक्यता दिसत आहे. या वेळेस तुम्ही तुमच्या रोमांचक प्रवासावर निघू शकता. त्याशिवाय लांबचा प्रवास होण्याची देखील पूर्ण शक्यता आहे. या आठवड्यात वेळेस लोकं मनोरंजनावर खर्च करू शकतात. तुम्ही कुटुंबातील लोकांसाठी वेळ घालवाल आणि त्या क्षणाचा भरपूर आनंद घ्याल.
 
मकर: आठवड्याच्या सुरूवातीत आपल्यात अति साहस येणार आहे, पण गणशेजीच्या सल्लानुसार तुम्ही दु:साहस करू नका, नाहीतर ते अंगाशी येईल. जर शक्य असल्यास कुठल्या प्रकारची गुंतवणूक करताना विशेष सावधगिरी बाळगा अन्यथा तुम्ही अडचणीत याल. तुमच्या वाणीत उग्रता असण्याची शक्यता आहे, म्हणून बोलताना नीट विचार करून बोला, कुणाचे मन दुखवू नका. कुणासोबत वाद विवाद करून आपण म्हणतो तेच खरे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या आठवड्यात करू नका. ज्ञान प्राप्तीसाठी तुमच्यात रुचि जागेल. कौटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि कार्यस्थळावर उच्च पदाधिकार्‍यांसोबत तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
 
कुंभ: गणेशजींनुसार, हा आठवडा तुमच्यासाठी फारच आनंदाचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत प्रेम प्रकरणात आणि वैवाहिक जीवनात बरेच रंगलेले असाल. आठवड्याच्या प्रारंभात व्यक्तिगत जीवन उत्तम राहण्याची शक्यता असून या काळात तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत एक अद्वितीय शक्तिचा संचार होत आहे. आर्थिक प्रकरणात पहिल्या दिवशी थोडी अडचण निर्माण होईल, पण नंतर तुमच्या स्थितीत सुधारणा येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही खरेदीवर अधिक लक्ष द्याल. मौज मस्तीसाठी तुम्ही एखाद्या पिकनिक स्थळावर जाण्याची योजना आखाल आणि त्याला अमलात देखील आणाल. 
 
मीन: गणेशजींच्या सल्ला प्रमाणे आठवड्याच्या सुरूवातीत तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवेल. तुमचे मन द्विधा मनस्थितीत राहणार आहे.  या आठवड्यात तुमचा कल भोगविलासाकडे अधिक राहणार आहे आणि व्यर्थमध्ये धनाचा अपव्यय होण्याची शक्यता संभवते. गणेशजी तुम्हाला सल्ला देत आहे अपव्ययाकडे लक्ष देण्यास सांगत आहे. वाहन चालवताना विशेष लक्ष ठेवण्याचा ही सल्ला या आठवड्यात तुम्हाला देण्यात आला आहे. आठवड्याच्या मध्यमध्ये तुम्हाला आर्थिक रुपेण थोडी निश्चितता मिळण्याची शक्यता आहे. संतान प्राप्तीसाठी व्याकुल असणार्‍या लोकांसाठी हा काळ श्रेष्ठ आहे, त्याचा वापर करून घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi