मेष
अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. राजकीय क्षेत्रातील तरुण मंडळींना चांगल्या संधी, नवीन जबाबदार्या मिळतील. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. त्याला विलंब लागेल व अविचारांची दिशा बदलावी लागेल. सांसारिक जीवनातील रुसवे फुगवे दूर होऊन सहजीवनाचा आनंद घ्याल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. नव्या आशा पल्लवीत होतील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल.
वृषभ
विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आपली काम करण्याची इच्छा तीव्र असेल तर असामान्य शक्तीची साथ आपणास मिळणार आहे. स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. आपल्या राशीच्या पंचमातील शुक्रावरुन चंद्राचे होणारे भ्रमण कवी, कलाकारांना शुभफलदेणारे राहील.
मिथुन
नवनवीन कल्पना आकार घेतील. व्यवसाय उद्योगात नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. नवीन कार्यारंभ कराल. आपल्या जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यायचा असे आपण मनोमन ठरवाल. महिला घरातील सुखसोयी वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. मातृसौख्य लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
कर्क
परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील. मन शांत राहिल्याने त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी होईल. गृहसौख्याचा आनंद लुटाल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीतून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या वैयक्तीक उत्कर्षास पूरक आहे. रचनात्मक कलाकृतींचा ध्यास घ्याल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. राशीतील शुक्र आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव देईल.
सिंह
मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. आर्थिक आवक वाढेल. वैयक्तीक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. नावीण्यपूर्ण घडामोडी घडतील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. धाडसी निर्णय घेतले जातील. आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करावे लागतील. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल.
कन्या
नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केलेत तर निश्चीत एखाद्या सवलतीचा लाभ घेता येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्याल. नव्या उमेदीने कामाला लागाल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. आठवड्याच्या सुरुवातीला अनपेक्षित प्रवासयोग घडून येतील. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नवीन कल्पना आकार घेतील. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल.
तूळ
कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने बदल करावे लागतील. आपल्या राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमणामुळे अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. गोड बोलून आपली कामे करुन घेण्यात यश येईल. वडिलधार्या व्यक्तींच्या सहकार्याने मोठे निर्णय घेणे शक्य होईल.
वृश्चिक
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना हा आठवडा फायदा करुन देणारा राहील. आपली सामाजिक पत उंचावेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. राशीतील बुध, राहू आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला प्रभाव पाडणारे राहतील. आपल्या संभाषणचातुर्याच्या जोरावर महत्त्वाची कामे मार्गी लावता येतील. मात्र भागीदारी व्यवसायातून आपले नुकसान करुन घेऊ नका.
धनु
आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. उत्तरार्धात अवाजवी साहस टाळावे. आपल्या वैयक्तीक समस्यांवर मार्ग निघेल. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. कर्मस्थानातून शुक्रावरुन होणारे चंद्राचे भ्रमण कलाकारांना सुसंधी देणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. तरुणांना नोकरीत मनाजोग्या ठिकाणी बदली झाल्यामुळे समाधान लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.
मकर
व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. पुढे घडणार्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे.शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांना यश मिळेल.
कुंभ
नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना सुसंधी लाभतील. आपल्या कार्यकौशल्याची प्रशंसा होईल. अष्टमातील शुक्रावरुन होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपले तत्व सोडून एखादे काम केले जाईल. मोहाला ब.ळी पडू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल.
मीन
न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता आहे. सप्तमस्थ शुक्रावरुन चंद्राचे भ्रमण होत आहे. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. भागीदारी .व्यवसायातून लाभ होतील. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे.