1. उन्हाळ्याच्या सर्रास प्रभाव नात्यांवर दिसून येत आहे.
एका मुलाला जेव्हा विचारण्यात आले की तू आज कोणापाशी झोपणार.. आई की बाबांकडे?
त्याने लगेच उत्तर दिले: मी तर कूलरजवळ झोपेन.
2. शिक्षक: ज्याला ऐकू येत नाही त्याला काय म्हणाल?
बंड्या: काहीही हाक मारा, त्याला कोणतं ऐकू येणार आहे!
3. बायोलॉजी शिक्षक: सेल म्हणजे शरीरातली पेश्या
फिजिक्स शिक्षक: सेल म्हणजे बॅटरी
इकॉनॉमिक शिक्षक: सेल म्हणजे विक्री
हिस्ट्री शिक्षक: सेल म्हणजे कैदखाना
इंग्रेजी शिक्षक: सेल म्हणजे मोबाइल
.
मी तर अभ्यास सोडूनच दिला बाबा...
ज्या शाळेत पाच शिक्षक आपसातच एका शब्दाच्या अर्थावर एकमत नाहीत त्या शाळेत शिकून आम्हाला मिळणार तरी काय!!!