आम्ही नेहमी लक्सचा पांढरा साबण वापरायचो. एकदा आईने लक्सचा हिरवा साबण मागवला. आई माझ्या लहान भावाला स्नानासाठी बाथरूम मध्ये घेवून गेली असता हिरवा साबण पाहून तो जोरात रडायला लागला. कारण विचारल्यावर तो बोलला, ''मी हिरव्या साबणाने स्नान करणार नाही.''
''का?''
''माझा रंगही हिरवा होईल ना.'' त्याने रडत सांगीतले.