Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरे माकडा

- श्रीरंग मधुकर पांचाळ

अरे माकडा
ND
अरे माकडा, पाय वाकडा,
का टाकती तू?
अकलेने तोकडा, आटलेला मुखडा
वेडावूनी दावीसी दुसऱ्यास का तू?
अरे माकडा, पाय वाकडा
का टाकती तू?
धुडगूस जीवनाचा करुनी सारा,
मांडलास हा काय पसारा
मसा सावरी सांग एकटा तू?
अरे माकडा, पाय वाकडा
का टाकती तू?
हातपायाने तू धाकटा
नाकानेही तू नकटा
सांग काय करणार तू?
चिडूनी दुसऱ्यावर
ओरबाडून सारे खाणार का तू?
अरे माकडा पाय वाकडा
का टाकती तू?

Share this Story:

Follow Webdunia marathi