आस्था दीपक लावते
मन मंदिरी हे गजानना
सदैव तेवत राहो ही
ज्योत विश्वासाची
उजेड पसरो विद्येचा
ह्या भूवारी
शुद्ध राहू दे अंत:करणं माझे
जीवन राहो सदैव निर्मळ
घेऊनी संगे गोडी, जशी दूध साखर नैवेद्याची
प्रसाद, सहयोगाचा, मदतीचा वाटू मी
तुझ्या आशीर्वादाच्या सावलीत राहू मी
दे आशिष देवा मजला
घडो सदैव जन कल्याण हातुनी माझ्या
दे माझ्या भक्तीला शक्ती
देवा हेच मागणे मागते शेवटी