उठा आता सोनू मोनू
Select Your Language
उठा आता सोनू मोनू
उठा आता सोनू मोनू
सहा वाजून गेले
शेजारचे गंपू संपू
शाळेत न्यायला आले ।।1।।
हे हवय ते नकोय
आईला नको कटकट
स्वत:ची आवराआवरी
करा बरे पटपट।।2।।
शाळेतून आल्यावर
खाऊ घ्यावा खाऊन
नंतर मग अभ्यास
करावा मन लावून।।3।।
रोजचा अभ्यास रोज
नीटनेटका करावा
सुट्टीतला काही वेळ
अभ्यासाला घालवावा।।4।।
खेळामध्ये परिक्षेत
यश मिळावं तुम्हाला
यापेक्षा वेगळं आणि
काय हवंय आम्हाला।।5।।
- राजीव सगर
पुढील लेख