Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगणेच विसरलो-

डॉ. गुणवंत चिखलीकर

जगणेच विसरलो-
ND
टी.व्ही. आला घरात नि बोलणेच विसरलो
गाडी येता दारी, चालणेच विसरलो।।1।।
ए.सी.च्या संगतीत, झाडाचा गारवा विसरलो
सेंट-स्प्रे आला नि ‍फुलाचा सुगंध विसरलो।।2।।
कॅलक्युलेटर आला हाती नि पाढेच विसरलो
फास्ट फूड आले नि तृप्तीचा ढेकर विसरलो ।।3।
रस्ते झाले डांबरी नि मृदगंध विसरलो
फ्लॅटमध्ये राहून शेजारधर्म विसरलो।।4।।
सिनेमांची पोस्टर बघून निरागस सौंदर्य विसरलो
पॉप संगीत ऐकून भावगीते विसरलो।।5।।
हसणे झाले दुर्मिळ नि जगणेच विसरलो।।6।।

Share this Story:

Follow Webdunia marathi