Select Your Language
पाने झाडाची
सौ. रश्मी गुजराथी
लाल जांभळे, पान कोवळे, पालव आंब्यांचे झाडावर तुरे पानांचे करती स्वागत चैत्राचेनागवेलीचे पान विड्याचे पूजेत मानाचे, पूजेसाठी ताम्हनात, मान तुळशीचे, दारावर तोरणात, शोभते पान आंब्याचे, पान केळीचे पाहता, सूर आठवती सनईचेआकार सुंदर, नाजूक तळवा, पान पिंपळाचे,खूण वहीत, पान जुने, बालपणीच्या आठवणींचे