Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भिवा, जिवा आणि शिवा

भिवा, जिवा आणि शिवा
WDNitin Chande
एक होता जीवा तो अगदी लहान होता
तो शाळेत जाऊ लागला
मुलांना तो आवडे
तो एके दिवशी घरी येत होता
बरोबर दुसरे मुलगे होते
एक मुलाचे नाव भिवा होते
भिवाने जिवाच्या पायात पाय घातला
तोच छोटा जिवा जमिनीवर पडला
जिवाचे कपडे धुळीत मळले
जिवाच्या अंगला घाण लागली
मुले जिवाला हसली, पण शिवा चटकन् धावत आला
शिवाने जिवाला उचलले
जिवाचे कपडे शिवाने झाडले
गुरुजी शाळेच्या दरवाज्यात उभे होते
गुरुजींनी काय झाले ते पाहिले होते
webdunia
WDNitin Chande
ते मुलांजवळ आले
गुरुजी भिवाला रागावले
गुरुजींनी शिवाला शाबासकी दिली
आणि म्हणाले,
'शिवा, तुला हे पैसे बक्षीस घे. याचे पेढे घेऊन खा.'

Share this Story:

Follow Webdunia marathi