Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीत सुविचार!

मराठीत सुविचार!

वेबदुनिया

ND
1. आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही. साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.
2. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. ओळख पटते.
3. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो. आळस माणसाचा शत्रू असतो.
4. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? माणूसकीची वागणूक महत्त्वाची.
5. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.
6. अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही.
7. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
8. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ! उगाच गवगवा नको.
9. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
10. आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते. एकीत खूप मोठे बळ असते हे खरे.

Share this Story:

Follow Webdunia marathi